Heart Disease Increasing In Youngster : तरुणांमध्ये वाढताय हृदयाच्या समस्या, कशी घ्याल काळजी?

How To Care Heart : 25-70 वयोगटातील व्यक्तींमध्ये सर्रासपणे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या वाढत असल्याचे दिसून येते.
Heart Disease Increasing In Youngster
Heart Disease Increasing In YoungsterSaam Tv

Heart Attack Symptoms :

25-70 वयोगटातील व्यक्तींमध्ये सर्रासपणे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या वाढत असल्याचे दिसून येते. दुर्लक्ष केल्यामुळे किंवा जागरूकतेच्या अभावामुळे अनेकांना जीव गमावत आहेत. दैनंदिन जीवनातील अनेक घटक हृदयाच्या समस्यांचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतली आणि वेळीच प्रतिबंध केल्यास हृदयविकाराच्या समस्या टाळता येऊ शकतात.

मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ बिपीनचंद्र भामरे यांनी हृदयविकाराच्या समस्या झपाट्याने वाढत आहे असे म्हटले आहे. हृदयाच्या वाढत्या समस्यांमागील कारणे कोणती हे आपण जाणून घेऊया.

Heart Disease Increasing In Youngster
Heart Attack Symptoms In Players : खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे? खेळाडूंनी कशी घ्यावी हृदयाची काळजी? जाणून घ्या सविस्तर

चुकीची जीवनशैली निवडणे हे भारतीयांमध्ये हृदय (Heart) व रक्तवाहिन्यासंबंधीच्या रोगास कारणीभूत ठरते. चुकीचा आहार, वाढता ताणतणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपानासारख्या वाईट सवयींमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा (Disease) सामना करावा लागतो.

याव्यतिरिक्त अनुवांशिकता, कौटुंबिक इतिहास आणि जन्मतः वजन कमी (Weight Loss) असणे हे देखील हृदयाच्या समस्यांना कारणीभूत ठरते. यामुळे हृदयविकाराचा झटका येणे आणि हृदयविकाराच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. एखाद्याच्या आहारामध्ये कर्बोदकांचा प्रमाण अधिक असणे, ज्यामुळे ओटीपोटात जास्त चरबी जमा होते आणि ते हृदयाच्या आरोग्यासाठी चिंतेची बाब ठरु शकते.

Heart Disease Increasing In Youngster
Shirdi Trip In Budget : बजेटमध्ये फिरा शिर्डी; वन डे ट्रिप कशी कराल? जाणून घ्या सविस्तर

ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्ती हृदयाच्या समस्यांना कारणीभूत ठरतात. आहाराचा विचार करताना, आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास धोका असतो. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन हे उच्च रक्तदाबामागचे मुख्य कारणे आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. कामाच्या व्यापामुळे तरुणांमध्ये तणावाचे प्रमाण वाढते आहे, शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी झाले आहे, परिणामी एकूण फिटनेस पातळी कमी झाली आहे.

1. हृदयाचे आरोग्य कसे जपाल?

एखाद्याचे वय काहीही असो, हृदयविकाराची समस्या उद्भविण्यासाठी केवळ वय कारणीभूत नसते. जीवनशैली निवडी, आहाराच्या सवयी, व्यायाम पद्धती आणि तणाव व्यवस्थापन तंत्र यासारखे विविध घटक एखाद्याचा आरोग्यावर लक्षणीय परिणाम करतात.

Heart Disease Increasing In Youngster
Bhiwandi One Day Trip: ठाणे जिल्ह्यातील भिंवडीतही आहेत फिरण्याची ठिकाणे; वन डे ट्रिप होईल अविस्मरणीय

तुमच्या हृदयाच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही नियमित हृदय तपासणीसाठी करणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब, उच्च रक्त शर्करा पातळी किंवा उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी त्यासंबंधीत औषधं वगळू नका. नियमित आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात रहा. तुमच्या हृदयावर ताण येणारी कोणतीही कठोर परिश्रम करणे टाळा. दम लागणे, जास्त घाम येणे किंवा छातीत दुखणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या हृदयाचे आरोग्य हे तुमचे प्रथम प्राधान्य असले पाहिजे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com