Vitamin C Benefits : व्हिटॅमिन सी अधिक महत्त्वाचे का? आरोग्यासाठी कसा होतो फायदा

Vitamin C : आपल्‍या शरीराचे कार्य सुव्‍यवस्थित होण्‍यासाठी योग्‍य प्रमाणात व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍स मिळणे महत्त्वाचे आहे.
Vitamin C Benefits
Vitamin C BenefitsSaam Tv

Benefits Of Vitamin C : आपल्‍या शरीराचे कार्य सुव्‍यवस्थित होण्‍यासाठी योग्‍य प्रमाणात व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍स मिळणे महत्त्वाचे आहे. ते रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी आणि हाडे मजबूत करण्‍यासाठी सामान्‍य वाढ व विकासाला साह्य करण्‍यामध्‍ये महत्त्वाचे आहेत. विशेषत: व्हिटॅमिन सी हे पौष्टिक घटक आजारांमधून लवकर बरे होण्‍यासाठी, तसेच दीर्घकाळापर्यंत आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी आवश्‍यक आहे.

व्हिटॅमिन सी का महत्त्वाचे आहे?

व्हिटॅमिन (Vitamins) सी चे दिसण्‍यात आलेले फायदे (Benefits) अविरत आहेत. प्रबळ अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि रोगप्रतिकारशक्‍ती सिस्‍टमला साह्य करते.

अॅबॉट इंडियाचे प्रादेशिक वैद्यकीय संचालक डॉ. पराग शेठ म्‍हणाले, ‘‘व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते, तरीदेखील अनेक भारतीयांना (Indian) पुरेशा प्रमाणत व्हिटॅमिन सी मिळत नाही. अॅबॉटमध्‍ये आमचा या व्हिटॅमिनबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे अधिकाधिक व्‍यक्‍तींना यामधून मिळणाऱ्या आरोग्‍यविषयक फायद्यांबाबत माहिती मिळू शकेल.’’

संशोधनांमधून निदर्शनास येते की, व्हिटॅमिन सी सप्‍लीमेंशन सामान्‍य सर्दीला कमी तीव्र व कमी कालावधीसाठी ठेवण्‍यास गुणकारी आहे. तसेच न्‍यूमोनिया रूग्‍णांचा हॉस्पिटलमधील स्‍टेचा कालावधी कमी झाल्‍याचे देखील निदर्शनास आले आहे.

Vitamin C Benefits
Vitamins Deficiency : जीवनसत्त्वाची कमतरता देऊ शकते अनेक आजारांना निमंत्रण !

क्लिनिकल संशोधनांनुसार, व्हिटॅमिन सी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार डोसमध्ये घेतल्यास विविध विद्यमान आरोग्य स्थितींमध्ये तुम्हाला मदत करू शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला मधुमेह असल्यास व्हिटॅमिन सी तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि लिपिड प्रोफाइल सुधारण्यास मदत करू शकते.

संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, व्हिटॅमिन सी कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. तसेच, ते तुमच्या शरीराला लोह शोषून घेण्यास मदत करू शकते, जे अॅनेमिया (शरीरात लोह पातळीची कमतरता) असलेल्या व्‍यक्‍तींना मदत करण्यासाठी महत्वाचे आहे. याशिवाय, हे व्हिटॅमिन जखमा बरे करण्यासाठी आणि दात व हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करण्यासाठी ओळखले जाते.

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे जोखीम घटक -

भारतातील बर्‍याच व्‍यक्‍तींमध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता आहे. यामध्ये उत्तर भारतातील जवळपास 74 टक्‍के वृद्ध व्‍यक्‍ती (60 वर्षे व त्यावरील) आणि दक्षिण भारतातील 46 टक्‍के व्‍यक्‍तींचा समावेश आहे.

Vitamin C Benefits
Vitamin C Deficiency : त्वचेवर दिसताय 'ही' लक्षणे ? असू शकते व्हिटॅमिन सी कमतरता !

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेसाठी सर्वात जास्त जोखीम निर्माण करणारे घटक पुढीलप्रमाणे -

  • वाढते वय (विशेषत: वृद्ध व्‍यक्‍ती)

  • कुपोषण

  • प्रदूषण किंवा धूर, बायोमास इंधनांशी एक्‍स्‍पोजर

  • धूम्रपान

  • विविध संसर्गजन्‍य व असंसर्गजन्‍य आजार (एनसीडी)

तुम्हाला व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचा अनुभव येऊ शकतो अशी काही लक्षणे असू शकतात, ज्यामध्ये स्नायूदुखी व सांधेदुखी, अशक्तपणा, जखमा हळूहळू बरे होणे आणि हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव यांचा समावेश असू शकतो. ही लक्षणे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची लक्षणे आहेत का हे पाहण्यासाठी डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करा.

व्हिटॅमिन सी सेवन कशाप्रकारे वाढवू शकता?

व्हिटॅमिन सी संपन्‍न अन्नासह संतुलित आहार शरीरातील पौष्टिक पातळी वाढवण्यास मदत करू शकतो. व्हिटॅमिनचे चांगले स्रोत असलेले काही पदार्थ आहेत: संत्री, आवळा (भारतीय गूसबेरी), पेरू, स्ट्रॉबेरी, किवी, ब्रोकोली, टोमॅटो, फ्लॉवर आणि लाल मिरची यांसारख्या भाज्या. या भाज्यांना उच्च तापमानात शिजवणे टाळावे (जसे उकळण्यासारख्या स्वयंपाकाच्या पद्धती) कारण यामुळे त्यांच्यातील व्हिटॅमिन सी चे प्रमाण कमी होऊ शकते.

चांगल्या पोषणासाठी आरोग्यदायी आहार महत्त्वाचा असला तरी कमतरतेचा सामना करण्यासाठी हे पुरेसे असू शकत नाही. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या डोसमध्ये व्हिटॅमिन सी सप्‍लीमेंशन व्हिटॅमिन सीची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असणारी चालना देण्यास उपयुक्त ठरू शकते.

Vitamin C Benefits
Vitamin Deficiency : 'या' जीवनसत्त्वाची कमतरता अधिक धोकादायक, जडू शकतो मधुमेह व हृदयविकाराचा आजार !

व्हिटॅमिन सी सप्‍लीमेंशन आहार घेण्यासंदर्भात मार्गदर्शन -

भारतीयांसाठी व्हिटॅमिन सी ची शिफारस केलेली आहारातील मात्रा भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणानुसार प्रौढ पुरुषांसाठी प्रतिदिन 80 मिलीग्रॅम आणि प्रौढ महिलांसाठी प्रतिदिन 65 मिलीग्रॅम प्रतिदिन आहे (गर्भवती आणि स्तनपान करणार्‍या महिलांसाठी प्रमाण वेगळे आहे).

सप्‍लीमेंशन घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आणि विशेषत: तुम्‍ही आरोग्‍यविषयक आजाराने (Disease) पीडित असाल तर आरोग्‍यविषयक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी योग्‍य डोसेज घेत असल्‍याची खात्री घ्‍या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com