Insecurity In Relationship : लग्न केल्यानंतरही तुमचा पार्टनर इनसिक्योर का असतो? असू शकतात ही 5 कारणे

Relationship : प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की लग्नानंतरचे आपले आयुष्य सुखी व्हावे.
Insecurity In Relationship
Insecurity In RelationshipSaam Tv

Relationship Tips : प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की लग्नानंतरचे आपले आयुष्य सुखी व्हावे. त्यामुळे एकमेकांसोबत सुखी आयुष्य जगण्यासाठी आपल्या जोडीदाराला समजून घेणे आवश्यक आहे. विशेषत: पत्नी आपल्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या आनंद त्याग करते.

मात्र तुमच्या जोडीदाराला (Partner) त्याच्या चुकीच्या सवयींमुळे हे लग्न (Marriage) टिकवणं कठीण झालं तर? तुमचे वैवाहिक जीवन कितीही परफेक्ट चालू असले तरी काहीवेळा नवऱ्याला बायकोबद्दल इनसिक्योर वाटते आणि वाद निर्माण होऊन हे नाते बिघडते. त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात अडचणी निर्माण होतात. अशा वेळेस महीलेला अशा पुरुषासोबत राहणे कठीण होऊन बसते.

Insecurity In Relationship
Physical Relationship : लैंगिक संबंधांसाठी बेडरुममध्ये 'हे' रंग ठरतील फायदेशीर!

आपल्या पतीसोबत प्रामाणिक आणि विश्वासू असलेल्या पत्नीला ही परस्थिती खूप वेदनादायक असते. एवढे प्रेम करूनही तिचा नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. त्यावेळेस महिलांनी हे समजून घेणे फार गरजचे आहे की ही त्यांची काही चूक नसून पतीला इनसिक्योर का वाटत आहे. तुमच्या पतीला कधी इनसिक्योर वाटतंय हे जाणून घेण्यासाठी येथे काही गोष्टी सांगितल्या आहेत.

प्रत्येक संभाषण जाणून घेयायचे -

पति-पत्नीच्या नात्यात देखील स्पेस गरजेचा आहे. जर नवरा सतत बायकोच्या फोन कॉल्सवर नजर ठेवत असेल तर अशा वेळेस नवऱ्यासोबत राहणे कठीण होते. दोघांमध्ये वाद वाढतात. तुमचे प्रत्येक संभाषण जाणून घेण्यासाठी जर पति प्रयत्न करत आहे. तर ते नक्कीच असुरक्षिततेचे लक्षण असते.

Insecurity In Relationship
Toxic Relationship : तुमचा पार्टनर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत रोखठोक करतो? कसे ओळखाल टॉक्सिक रिलेशनशीप?

तुमच्यावर आरोप करणे -

तुम्ही पतिची काळजी घेल्यास त्यांना वाटते तुम्हाला त्यांच्याकडून काहीतरी हवे आहे. म्हणून सतत तुमच्यावर असे आरोप करणे. म्हणेच त्यांना तुमच्याबद्दल इनसिक्योर वाटत आहे. असे ऐकल्यावर कुटुंबाची काळजी घेतल्यावर मिळणारा आनंदही व्यर्थ वाटतो.

तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा मागोवा ठेवणे -

जेव्हाही तुम्ही घराबाहेर जाता किंवा माहेरी जाता. तेव्हा जर तुमचा पती तुमच्या येण्या- जाण्यावर लक्ष ठेवून तुम्ही किती वेळ घराबाहेर होता हे सांगत असेल तर ते असुरक्षिततेचे लक्षण असते.

कधीही प्रशंसा नाही करत -

पति कधीही पत्नीची प्रशंसा करत नाही किंवा तिचे आभार मानत नाही. परंतू स्तुती करायला त्यांना नक्कीच आवडते. जे असुरक्षिततेचे सर्वात मोठे लक्षण आहे. अशा पतीसोबत राहणे महिलांसाठी खूप कठीण होते.

कधीही एकटे सोडत नाही -

पति कधीही आपल्या पत्नीला कोणासोबत सोडत नाहीत. त्यांच्या मनात तुम्हाला गमवण्याची भिती असते त्यामुळे ते तुमच्याशी असे वागतात. मात्र तुमच्यासाठी हे त्रासदायक असू शकते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com