
मुंबई : आजच्या युगात मोबाईल (Mobile) फोन आणि सोशल मीडिया हा सगळ्याच्या आयुष्याच्या महत्त्वाचा भाग बनला आहे. अशी एकही व्यक्त्ती नसेल जिच्याकडे मोबाईल फोन नसेल. परंतु, जर या मोबाईल फोनचा अतिवापर केला तर आपल्याला त्याचे नुकसान नक्कीच होऊ शकते. कारण त्याचा अतिवापर केल्याने आपण आजारी पडू शकतो. सोशल मीडिया (Social Media) हा आजच्या युगातला सर्वात मोठा शत्रू आहे. हल्ली सोशल मीडियाच्या ट्रेंडनुसार फोनचा वापर आपण रात्री- अपरात्री केव्हाही करतो. परंतु, फोनचा वापर रात्री अधिक प्रमाणात केल्यास त्याच्या प्रकाशामुळे आपल्या डोळे (Eye) व मेंदूवर त्याच्या थेट परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार जडतात. जर मोबाईल फोनचा वापर करून आपले आरोग्य जपायचे असेल तर या गोष्टींची काळजी आपल्याला घायला हवी. (Digital Detox in Marathi)
हे देखील पहा -
सोशल मीडियाच्या युगात आपण आपले मन आणि आरोग्य कसे निरोगी ठेवू शकतो? यासाठी आपल्याला खालील पद्धतींचा अवलंब करावा लागेल.
१. बहुतेक वेळा आपण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल फोन हातात घेतेल्यामुळे आपल्या डोळ्यांच्या दृष्टीला मोबाईल फोनचा प्रकाश सहन होत नाही. परंतु जर आपण उठल्याबरोबर मोबाईल फोन हाताळत बसलो तर आपल्याला डोकेदुखीला किंवा डोळ्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते. परंतु, मोबाईल फोनचा वापर करून आपले आरोग्य जपायचे असेल तर या गोष्टींची काळजी आपण घ्यायला हवी. आपल्याला मेसेज, ई-मेल किंवा सोशल मीडिया प्रोफाइल तपासण्याची सवय असेल तर शक्यतो सकाळी या गोष्टी टाळा. त्याऐवजी वर्तमानपत्र वाचा, व्यायाम किंवा मॉर्निंग वॉकला जा, आपला दिवसभराचा फोकस सेट करा. मोबाईल फोनचे नोटिफिकेशन्स बंद ठेवा ज्यामुळे तुमचे लक्ष फोनकडे सतत जाणार नाही.
२. दुपारच्या जेवणाचा ब्रेक आपल्याला एकाग्र राहण्यास मदत करतो. हा वेळ आपण आपल्याला कुटुंबासोबत किंवा ऑफिस टीमसोबत संबंध दृढ करण्यासाठी या वेळेचा उपयोग करा. तुम्ही कुटुंबासोबत असाल तर अशावेळी फोन दूर ठेवा. जर ऑफिसमध्ये दुपारचे जेवण करत असाल तर सहकाऱ्यासोबत जेवणाचा आनंद घ्या. अशावेळी मोबाईल फोनला सायलेंटवर ठेवा.
३. तुम्ही ऑफिस किंवा इतर कामातून संध्याकाळी घरी आल्यानंतर फोनकडे दुर्लक्ष करायला हवे. मुलांसोबत फिरायला जा. त्यांच्यासोबत खेळ त्यांना नवनवीन गोष्टी शिकवा. हा वेळ पूर्णतः तुमच्या कुटुंबासोबत घालवा. त्यामुळे तुम्हाला देखील फ्रेश वाटेल आणि तुम्हाला तुमच्या वेळेचा आनंदही घेता येईल.
४. झोपण्याच्या एक तास आधी फोनची स्क्रीन वापरणे थांबवा. परंतु, जरी आपल्याला फोन सोबत ठेवण्याची सवय असेल, तर अशावेळी audible अॅप्सचा वापरा. गाणी, एफएम किंवा कथा ऐका यामुळे तुम्ही मनोरंजन करू शकता आणि त्याचबरोबर फोनच्या प्रकाशापासून दूर राहू शकाल. झोपण्यापूर्वी फोन शक्यतो लांब ठेवा.
५. झोपताना सोशल मीडियाचा वापर केल्याने झोपेची समस्या वाढते. इंटरनेट आणि मोबाईलचा अधिक वापर केल्याने कामाचा ताण आणि जास्त कामाची भावना वाढते व अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
आपल्याला डिजिटल डिटॉक्सची गरज आहे कसे समजेल.
काही वेळ फोन न वापरल्यास आपल्याला अस्वस्थता आणि तणाव जाणवू लागल्यास, काही मिनिटांनंतर आपण फोन चेक करतोय का ? सोशल मीडियाचा वापर केल्यानंतर अस्वस्थता, निराशा आणि नैराश्य कमी होतय असे जाणवू लागल्यास तर समजून घ्या की, आपल्याला डिजिटल डिटॉक्सची गरज आहे.
Edited By - Komal Damudre
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.