Sleep Disorders: रात्री झोप का येत नाही ? त्याचे नेमके कारण काय?

आजकाल आपल्या कामाच्या व्यापामुळे आपली झोप पूर्ण होत नाही.
Sleep disorder, insomnia, sleep problem, sleep disorders in M
arathi, sleep disorder symptoms, sleep disorder side effects
Sleep disorder, insomnia, sleep problem, sleep disorders in M arathi, sleep disorder symptoms, sleep disorder side effectsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आजकाल आपल्या कामाच्या व्यापामुळे आपली झोप पूर्ण होत नाही. दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्याला विश्रांतीची गरज असते परंतु, कधी कधी आपले थकलेले असून सुध्दा आपल्या शांत झोप लागत नाही.(Sleep disorders in Marathi)

हे देखील पहा -

आजकाल तरुणांमध्ये चिंता, बैचेनी व ताणतणावाचे कारण अधिक वाढले आहे. त्यामुळे निद्रानाशामुळे नैराश्य आणि तणावाचा सामना करावा लागतो. झोपेचे आणि आपले गणित थोडे वेगळे आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवसभराच्या थकव्यामुळे अंथरुणावर पडल्याबरोबर झोप येते. तर काहींना किती ही प्रयत्न करुन झोप काही लागत नाही. अशावेळी ते काही औषधांचा (Medicine) आधार घेण्याचा प्रयत्न करतात. तणावाची अनेक कारणे असू शकतात परंतु, त्यामुळे झोप न येण्याचे प्रमाण वाढू शकते. आपण पुरेशी विश्रांती न घेतल्यास आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. काही वेळा जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे देखील हा त्रास जाणवू शकतो. त्याची कारणे कोणती हे जाणून घेऊया.(sleep disorder symptoms)

झोप न येण्याचे अनेक कारणे असू शकते. काहीवेळा बद्धकोष्ठता, अपचन किंवा इतर कोणत्याही आजारामुळे ते कॉफी किंवा कॅफिनयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे होऊ शकते. तसेच आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यासही आपल्या झोप येत नाही.(natural remedies for good sleep)

Sleep disorder, insomnia, sleep problem, sleep disorders in M
arathi, sleep disorder symptoms, sleep disorder side effects
झोप पूर्ण न झाल्यास आपण पडू शकतो या व्यसनांना बळी!

झोप येण्यासाठी उपाय

निद्रानाशाचा सामना करण्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनात काही बदल करावे लागतील, ज्यामुळे आपल्याला या समस्येपासून मुक्तता मिळेल.

१. आपण आपल्या जीवनशैलीत चालणे, जॉगिंग, पोहणे किंवा योगासने (Yogasana) यांचा समावेश करू शकतो. व्यायामाला आपल्या जीवनाचा भाग बनवल्यास शारीरिक हालचाली वाढून शरीर थकते व आपल्याला झोप येते.

२. अल्कोहोलचे प्रमाण मर्यादित असायला हवे. अल्कोहोल असलेले कोणतेही पदार्थ झोपण्यापूर्वी घेऊ नये.

३. कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. तसेच झोपताना अधिक विचार करू नये त्यामुळे मेंदूच्या स्नायूंमध्ये तणाव निर्माण होतो व आपल्याला झोप येत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com