Winter Health : हिवाळ्यात टोमॅटोचे सूप प्या, आरोग्याला मिळतील अनोखे फायदे !

या हंगामात, आपण अनेक भाज्यांच्या मदतीने सूप बनवू शकता. पण टोमॅटो सूपची चव काही औरच...
Winter Health
Winter HealthSaam Tv

Winter Health : हिवाळा सुरु झाला की, वातवारणात गारवा पसरतो त्यामुळे आपल्याला सतत काहीतरी उबदार हवे असते. त्यातच हवामान थंड असले की, बहुतेक लोकांना काहीतरी गरम खाण्याची किंवा पिण्याची इच्छा असते. अशा परिस्थितीत सूप पिणे हा नक्कीच एक चांगला पर्याय मानला जातो. सूपच्या उबदारपणामुळे तुमचे शरीर आणि मन प्रसन्न होते. खरं तर, या हंगामात, आपण अनेक भाज्यांच्या मदतीने सूप बनवू शकता. पण टोमॅटो सूपची चव काही औरच...

टोमॅटो सूपची चव अप्रतिम असते आणि म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते आवडते. इतकंच नाही तर हिवाळ्याच्या आहाराचा भाग बनवल्यास इतरही अनेक फायदे मिळू शकतात. जाणून घेऊया त्याबद्दल

Winter Health
Winter Recipe : हिवाळ्यात चाखा आवळ्याच्या मुरंब्याची चव, पहा रेसिपी

1. वारंवार आजारी पडताय ?

हिवाळ्यात, बहुतेक लोक वारंवार सर्दी आणि फ्लूमुळे त्रस्त असतात. पण जर तुम्ही तुमच्या आहारात टोमॅटो सूपचा समावेश केला तर तुम्ही या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळवू शकता. तसेच टोमॅटो सूपमध्ये व्हिटॅमिन क खूप चांगल्या प्रमाणात आढळते, त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. ज्यामुळे तुमचे शरीर बॅक्टेरियाशी लढून तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवते.

2. शरीराचे तापमान राखण्यासाठी

या ऋतूत थंडीपासून वाचण्यासाठी आपण सतत चहा किंवा कॉफी (Coffee) इत्यादींचे सेवन करत असतो. परंतु अशी पेये सतत प्यायल्याने आपल्या आतड्यांना त्रास होऊ शकतो. तर दुसरीकडे कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात डिहायड्रेशनची समस्या वाढते. अशावेळी टोमॅटोचे सूप प्यायल्याने शरीरातील पाण्यासोबतच तापमानही राखते.

3. वजन वाढणार नाही

बहुतेक लोकांना फक्त हिवाळ्यातच वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. या ऋतूत शारीरिक हालचाली खूपच कमी असतात. याशिवाय लोक दिवसभर काही ना काही खातात. पण हिवाळ्याच्या आहारात टोमॅटो सूपचा समावेश केल्यास वजन राखण्यास मदत होते. यात खूप कमी कॅलरी असल्यामुळे ते आपल्या दैनंदिन कॅलरीचे प्रमाण वाढवत नाही. तसेच यात असणाऱ्या फायबरमुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते.

4. टॉक्सिन्स बाहेर फेकते

हिवाळ्यात, लोक विचार न करता चुकीच्या आहाराचा सुरु करतात. त्यामुळे शरीरात केवळ विषारी पदार्थ जमा होत नाहीत तर पचनाशी संबंधित समस्याही उद्भवतात. टोमॅटो सूप दोन्ही समस्या दूर करण्यास मदत करते. टोमॅटो (Tomato) सूपमध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणामुळे, जेव्हा तुम्ही त्याचे नियमित सेवन करता तेव्हा ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. ज्यामुळे UTI देखील संरक्षित राहाते. याशिवाय टोमॅटोमध्‍ये असलेले फायबर तुमच्‍या पाचन तंत्राला चांगले काम करण्‍यास प्रोत्‍साहन देते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com