Women Health : प्रसूतीनंतर निदान महिनाभर तरी महिलांनी घ्यायला हवी 'या' गोष्टीची काळजी

बाळाची काळजी घेणे व बदलेल्या जीवनशैलीमुळे त्यांना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
Women Health
Women HealthSaam Tv

Women Health : प्रसूतीनंतर अनेकदा महिला आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. जन्मलेल्या बाळाच्या संगोपनामध्ये त्याच्या संपूर्ण दिवस जातो. बाळाची काळजी घेणे व बदलेल्या जीवनशैलीमुळे त्यांना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

सामान्यतः प्रसूतीनंतर महिलांना दीड महिना स्वतःची खूप काळजी घ्यावी लागते. प्रसूतीनंतर 40 दिवस आरोग्यदायी आहार घेण्यासोबतच महिलांनी स्वतःची काळजी घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. यामुळे आई आणि मूल दोघेही निरोगी राहतात. प्रसूतीनंतर महिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Women Health
Women's Health : सावधान ! मासिक पाळीच्या वेळी योनी मार्गात मेन्स्ट्रुअल कप अडकला तर...

1. भरपूर पाणी प्या

प्रसूतीनंतर स्त्रीने भरपूर पाणी प्यावे. पाणी न पिल्याने डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपल्या आहारात सूप, ज्यूस, नारळपाणी आणि कोशिंबीर इत्यादी द्रवपदार्थांचा समावेश करावा. याशिवाय आई आणि मुलाने काही वेळ सूर्यस्नान करावे. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी टिकून राहते.

2. स्वच्छतेची काळजी घ्या

प्रसूतीनंतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच स्त्रीने स्वतःच्या आणि मुलाच्या स्वच्छतेकडेही पूर्ण लक्ष दिले पाहिजे. ऑपरेशनने प्रसूती झाली असेल तर तो भाग कोमट पाण्याने स्वच्छ करावा. यामुळे देखील वेदना होणार नाहीत.

Women Health
Women in saree : पुरुषांना स्त्रिया साडीमध्ये अधिक आकर्षित का दिसतात ?

3. पॅक्ड आणि जंक फूडला नको

प्रसूतीनंतर महिलांनी बाजारात मिळणारे पॅकेज केलेले किंवा जंक फूड (Food) खाणे टाळावे. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. याशिवाय तूप किंवा सोडियमचा जास्त वापर करू नका. साधारण प्रसूतीनंतर साधारण 15 दिवसांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम करा.

4. निरोगी आहार घ्या

प्रसूतीनंतर वजन आणि पाठदुखी कमी करण्यासाठी महिलांनी (Women) व्यायामासोबतच आहारात व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. गहू आणि धान्यातूनही मुलाला पोषण मिळते. याशिवाय सकाळचा जड नाश्ता, दुपारचे हलके जेवण आणि संध्याकाळी थोडे जड अन्न यांचा पौष्टिक आहारात समावेश करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com