Women Health : मासिक पाळीच्या काळात अधिक वेदना होताय ? फक्त 'या' 3 स्टेप फॉलो करा, त्रास होईल गायब !

काही महिलांना मासिक पाळीची वेदना इतकी त्रासदायक असते की त्यांना बेडवरून उठताही येत नाही.
Women Health
Women HealthSaam Tv

Women Health : दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीचे कालचक्र हे ठरलेले असते. हे चक्र चुकले की, महिलांची चिंता वाढू लागते. चिंतेसोबतच त्यांना होणारा त्रास देखील वाढू लागतो. तसेच ही चिंता इथपर्यंत न थांबता ती मासिक पाळी येऊ पर्यंत सुरुच असते. एकादा का ती आली की होणाऱ्या वेदनेमुळे अनेकदा महिलांची चिडचिड होते.

मासिक पाळीच्या वेदना सर्व स्त्रियांना होत नाहीत. एकीकडे, जिथे काही महिलांना या वेदनांबद्दल (Pain) पूर्णपणे माहिती नसते, तर दुसरीकडे काही महिलांना ही वेदना इतकी त्रासदायक असते की त्यांना बेडवरून उठताही येत नाही. हे वय, हार्मोन्स, आहार आणि आनुवंशिक घटकांशी संबंधित असते.

Women Health
After Periods : मासिक पाळीनंतर तुमचा देखील चेहरा चमकतो का ? जाणून घ्या

तुम्ही देखील अशा महिलांमध्ये (Women) असाल ज्यांना मासिक पाळी दरम्यान खूप वेदना सहन कराव्या लागतात किंवा त्याचा प्रवाह अनियंत्रित राहतो, तर देशी तूप तुपाचे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया याचा कसा वापर कराल

देशी तूप मासिक पाळीच्या दुखण्यावर कसे आराम देते?

1. देशी तुपात अनेक नैसर्गिक गुणधर्म आढळतात. ज्यामुळे स्नायू लवचिक, ऊती मऊ आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्याचे काम करते. मासिक पाळीच्या वेदनेचा संबंध या सगळ्या गोष्टींशी कुठेतरी जोडलेला असतो. जेव्हा हार्मोनल असंतुलन कमी होते, तेव्हा मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम मिळतो.म्हणूनच तुम्ही दररोज तुमच्या आहारात एक ते दोन चमचे देशी तुपाचे सेवन केले पाहिजे. मासिक पाळी दरम्यान तुम्ही दररोज 2 ते 3 चमचे सेवन करू शकता.

2. तुम्हाला लैक्टोज इंटॉलरेंस असली तरीही तुम्ही तुपाचे सेवन करू शकता कारण तुपात असा कोणताही गुणधर्म आढळत नाही ज्यामुळे तुम्हाला एलर्जी होऊ शकते किंवा प्रतिक्रिया होऊ शकते.

3. देशी गाईच्या दुधापासून तयार केलेल्या एक चमचा देशी तुपात सुमारे 130 कॅलरीज, 107 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन-ए, सुमारे 0.4 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन-ई आणि 1.1 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन-के असतात, हे सर्व आपल्या शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात. या एक चमचा तुपामध्ये 15 ग्रॅम चरबी देखील असते, जी शरीरासाठी आवश्यक असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com