Women Health : महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची क्षमता कमी झाल्यास उद्भवतात अनेक समस्या, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

अनेकदा टेस्टोस्टेरॉन बद्दलच्या समस्या या पुरुषांमध्ये दिसून येतात पण हे स्त्रियांमध्ये देखील आढळून येते
Women Health
Women HealthSaam Tv

Women Health : लैंगिक क्षमतेविषयी बोलायचे झाले तर अनेकांना वाटते हे फक्त पुरुषांशी संबंधित आहे. पण याचा जितका चांगला वाईट परिणाम पुरुषांसाठी होतो तितकांच महिलांवरही होत असतो. अनेकदा टेस्टोस्टेरॉन बद्दलच्या समस्या या पुरुषांमध्ये दिसून येतात पण हे स्त्रियांमध्ये देखील आढळून येते.

टेस्टोस्टेरॉन हा एक प्रकारचा लैंगिक संप्रेरक आहे आणि पुरुषांच्या शारीरिक विकासात ते खूप महत्वाचे आहे. पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या निर्मितीसाठी टेस्टोस्टेरॉन देखील जबाबदार असल्याचे मानले जाते. टेस्टोस्टेरॉन पुरुषांमध्ये तसेच महिलांमध्ये आढळते परंतु,पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ते खूपच कमी आहे. टेस्टोस्टेरॉन महिलांच्या अंडाशय, चरबी पेशी आणि त्वचेच्या पेशींमध्ये तयार होते.

Women Health
Women's Health : रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांनी आपले आरोग्य कसे जपायला हवे ?

तज्ज्ञांनुसार, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कितीतरी पटीने कमी असते, परंतु त्याची पातळी वाढल्याने आणि कमी झाल्यामुळे त्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. टेस्टोस्टेरॉनच्या वाढत्या पातळीचा महिलांवरही परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, महिलांची प्रणाली इस्ट्रोजेनद्वारे चालविली जाते तर पुरुषांची प्रणाली टेस्टोस्टेरॉनद्वारे चालविली जाते. टेस्टोस्टेरॉन कमी झाल्यामुळे महिलांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते ते जाणून घेऊया.

तज्ज्ञांच्या मते, स्त्री (Women) हार्मोन्स इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन व्यतिरिक्त, अंडाशय देखील टेस्टोस्टेरॉन तयार करतात. हे मेंदूच्या पिट्यूटरी ग्रंथी नावाच्या भागातून उद्भवते. स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी पुनरुत्पादक ऊतींच्या देखभाल आणि आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे ही समस्याप्रधान असू शकते आणि जर ती सतत होत राहिली तर त्याचा एकूण शारीरिक आरोग्यावर (Health) परिणाम होऊ शकतो.

Women Health
Physical Relationship : प्रत्येक जोडीदाराने पाळायला हवे लैंगिक संबंधाचे 'हे' ४ नियम !

महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होण्याची लक्षणे

टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. टेस्टोस्टेरॉन कमी झाल्यामुळे महिलांमध्ये अशा प्रकारची समस्या उद्भवू शकते.

  • लैंगिक असंतोष

  • स्नायू कमी होणे

  • मूड स्विंग्स

  • थकवा जाणवणे

  • कामवासनेचा अभाव

  • केस गळणे / केस पातळ होणे

  • कोरडी त्वचा

महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची भूमिका कशी असते

टेस्टोस्टेरॉन हे महिलांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे त्यांच्या शरीरातील विविध कार्यांमध्ये मदत करते. उदाहरणार्थ, टेस्टोस्टेरॉनची सामान्य पातळी स्त्रियांच्या मूडवर नियंत्रण ठेवते आणि ते हाडांसाठी देखील जबाबदार असते. यासोबतच हे महिलांच्या स्नायूंना मजबूत करण्याचे काम करते. त्यामुळे शरीरातील चरबीही कमी होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com