Women With Beard : अरेच्चा ! हिला तर दाढी, दिवसाला 2 वेळा करते शेविंग तरी...

एका महिलेला दाढी आणि मिशा आहेत आणि ती 'दाढी लेडी' या नावाने प्रसिद्ध आहे
Women With Beard
Women With BeardSaam Tv

Women With Beard : वय वाढत असताना मुले व मुलींमध्ये अधिक बदल दिसून येतात. मुलांना दाढी-मिशी येऊ लागते तर मुलींना मासिक पाळी. जर एखाद्या मुलामध्ये मानवी वाढ हार्मोनची कमतरता असेल तर दाढी आणि मिशांची वाढ थांबते आणि दुसरीकडे, जर महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन असेल तर त्यांच्या दाढी आणि मिशा वाढतात.

नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये एका महिलेला दाढी आणि मिशा आहेत आणि ती 'दाढी लेडी' या नावाने प्रसिद्ध आहे. ही महिला कोण आहे आणि महिलांमध्ये दाढी-मिशी येण्याची कारणे काय आहेत?

Women With Beard
Viral Video : चक्क ! लग्नात काढली नवरदेवाची गाढवावरुन वरात, वऱ्हाडी म्हणाले...

ही महिला कोण आहे ?

परफॉर्मर डकोटा कुक असे दाढी असलेल्या महिलेचे नाव असून ती 30 वर्षांची आहे. अमेरिकेतील लास वेगास येथील कलाकार असून दिवसातून दोनदा दाढी करायची. तिच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती 13 वर्षांची होती तेव्हा तिला दाढी येऊ लागली. पूर्वी ती वॅक्सने केस काढायची पण आता तिने शेव्हिंग आणि वॅक्सिंग करणे बंद केले आहे.

वयाच्या १३ व्या वर्षापासून केस येत आहेत

तिचे पहिल्यांदा चेहऱ्यावर केस वाढण्यास सुरुवात केली जेव्हा ती 13 वर्षांची होती. चेहऱ्यावर खूप केस असल्याचे पाहून ती देखील नैराश्याची शिकार झाली. सुरुवातीला ती आठवड्यातून दोनदा दाढी करायची आणि दर आठवड्याला वॅक्सिंगही करून घ्यायची. तिने आपल्या चेहऱ्या सुंदर करण्यासाठी त्यावर अनेक जखमा करुन घेतल्या. त्यामुळे चेहरा लाल व्हायचा आणि खाज सुटायची. या समस्येमुळे त्याने शेव्हिंग आणि वॅक्सिंग करणे बंद केले.

डॉक्टरांच्या (Doctor) म्हणण्यानुसार, तिच्या चेहऱ्यावर दाढी असण्यामागे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी अधिक असल्यामुळे हे होऊ शकते. 2015 मध्ये ती एका मैत्रिणीशी बोलत असताना तिला सर्कसमध्ये दाढीवाली बाई दिसली आणि जाऊन तिच्याशी बोलली. तिच्याशी बोल्यानंतर तिच्या अनेक बदल झाले व तीने वॅक्सिंग सोडून तिच्या चेहऱ्यावरील केस वाढू देण्याचा निर्णय घेतला.

महिलांमध्ये दाढी आणि मिशा येण्याची कारणे

  • काही महिलांच्या शरीराच्या काही भागात जास्त केस येतात. हे केस ओठांच्या वर, हनुवटी, छाती, पोटाच्या खालच्या भागावर असतात आणि कालांतराने दाट होतात.

  • पुरुषांच्या शरीराच्या ज्या भागांवर केस दाट असतात, त्या भागांवर महिलांचेही केस दाट असतात, असेही म्हणता येईल.

  • वैद्यकीय भाषेत या स्थितीला हर्सुटिझम म्हणतात. शरीरात पुरूष संप्रेरक वाढल्याने किंवा स्त्री संप्रेरककमी झाल्यामुळे हार्मोन्सचे असंतुलन होते आणि अनेक ठिकाणी नको असलेले केस येतात.

  • हर्सुटिझम ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या काही भागांवर जास्त केस वाढतात.

  • हर्सुटिझममध्ये स्त्रियांच्या शरीरावर नको असलेले केस (Hair) सोबत आवाज जड होतो, स्तनाचा आकार कमी होतो, स्नायू वाढतात, सेक्स ड्राइव्ह वाढते,पुरळ येतात.

  • PCOS ची समस्या असलेल्या महिलांपैकी 70-80 टक्के महिलांना हर्सुटिझम होण्याची शक्यता असते. हर्सुटिझमची अनेक कारणे असू शकतात.

  • ही स्थिती पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, एन्ड्रोजनचे उत्पादन, औषधोपचार, रजोनिवृत्तीनंतर, कुशिंग सिंड्रोम इत्यादीमुळे होऊ शकते.

  • ही स्थिती सामान्यतः भूमध्यसागरीय, हिस्पॅनिक, दक्षिण आशियाई किंवा मध्य पूर्व वंशाच्या स्त्रियांमध्ये दिसून येते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com