जागतिक पर्यावरण दिन २०२२: निसर्गाचे जतन व संवर्धन

आपल्या बदलत्या जीवनशैलीनुसार आज प्रत्येक माणसाकडे वाहन आहे.
World environment day 2022
World environment day 2022ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या बदलत्या जीवनशैलीनुसार आज प्रत्येक माणसाकडे वाहन आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडावे लागते.

हे देखील पहा -

दैनंदिन प्रवासासाठी सायकल किंवा सार्वजनिक वाहतूक वापरण्यापासून ते प्लास्टिकचा वापर कमी करण्यापर्यंत, आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. निसर्गाने आपल्याला सर्व आवश्यक संसाधने प्रदान करून नेहमीच उदार केले आहे. हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम आपल्याला वेळोवेळी सावध करत असतात. मानवी कृती पर्यावरणाचा कसा विनाश करत आहेत. आपण टिकाऊपणा आणि पर्यावरणास अनुकूल जीवन जगण्यासाठी आवश्यक पावले उचलणे महत्त्वाचे आहे. आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल केल्यास निसर्गाचे जतन व संवर्धन आपल्याला करता येईल.

कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी काही टिप्स

१. आपल्या रोजच्या प्रवासाच्या गरजांसाठी वाहनांऐवजी चालण्याचा प्रयत्न करा. सायकल चालवणे किंवा सार्वजनिक वाहतूकींचा वापर करा.

World environment day 2022
जागतिक सायकल दिवस : महत्त्व आणि त्याचे फायदे

२. रस्त्यावर कचरा टाकणे किंवा थुंकणे टाळा. सरकारे सांगितलेल्या ओला कचरा व सुका कचरा यांची योग्य विल्हेवाट करा. आपला परिसर स्वच्छ (Clean) ठेवण्यासाठी सामुदायिक मोहिमांमध्ये सहभागी व्हा.

३. प्लास्टिकच्या बाटल्या किंवा प्लास्टिकची कोणतीही वस्तू वापरणे टाळा. प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंची मागणी कमी झाल्यास त्याचा वापरही कमी होईल.

४. घराबाहेर जाताना दिवे, पंखे बंद करा आणि ऊर्जा वाचवा. हिवाळ्यात हीटर वापरणे टाळा आणि त्याऐवजी उबदार कपडे घाला. तसेच, उन्हाळ्यात एअर कंडिशनर माफक प्रमाणात वापरा.

५. शक्य असलेल्या उत्पादनांचा पुनर्वापर करा किंवा रिसायकल करा. ज्यूसच्या बाटल्या फेकून देण्याऐवजी त्यांचा घरातील इतर गोष्टींसाठी वापर करा. खरेदीला जाताना कागदी पिशव्या किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांवर अवलंबून न राहता स्वतःची कापडी बॅगेचा वापर करा.

७. पाणी (Water) वाचवा आणि शॉवर वापरण्यापेक्षा बादलीच्या पाण्याने आंघोळ करा. जास्तीत जास्त झाडे (Tree) लावा, स्वतःला आणि इतरांना पर्यावरणाबद्दल जतन करण्यासाठी सांगा

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com