
आज जागतिक EV दिवस आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला देशातील स्वस्त आणि चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगत आहोत. या ई-स्कूटरद्वारे दैनंदिन कामे सहज पूर्ण करता येतात. विशेषत: कॉलेज, विद्यापीठ किंवा कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही ई-स्कूटर चांगला पर्याय ठरू शकते.
तुम्ही ही स्कूटर EMI वर देखील खरेदी करू शकता. या फंकी दिसणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव एव्हॉन ई प्लस आहे. याची किंमत फक्त 25 हजार रुपये आहे. ही एका चार्जवर 50KM पर्यंत धावू शकते.
Avon E Plus चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Avon E Plus ई-स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, याची मोटरची पॉवर 220 वॅट्स आहे. यात 0.57 kWh चा बॅटरी पॅक आहे. याला पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 8 तास लागतात. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 50Km पर्यंत चालवता येते. (Latest Marathi News)
याची टॉप स्पीड 24 किमी प्रतितास आहे. म्हणजेच ही ई-स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशनची गरज नाही. नियमांनुसार ज्या वाहनांचा वेग ताशी 25 किमीपेक्षा जास्त असेल त्यांना परवाना आवश्यक असतो. (Utility News)
या स्कूटरमध्ये सिंगल सीट उपलब्ध आहे. जी खूप मोठी आणि आरामदायी आहे. फ्लॅट फूटरेस्ट आणि एक ट्रंक समोर उपलब्ध आहे. मागील बाजूस एक बूट स्पेस बॉक्स आहे. त्यात आवश्यक वस्तू ठेवता येतात. बॉक्समध्ये हेल्मेटही सहज येते. विशेष म्हणजे यात पेडल्सही उपलब्ध आहेत. जर कधी बॅटरी संपली तर ही स्कूटर पेडलच्या मदतीने सहज चालवता येते.
मासिक EMI किती असेल?
या स्कूटरची किंमत 25,000 रुपये आहे. याशिवाय तुम्हाला याच्या विम्यासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागतील. आता समजा तुम्ही 5,000 रुपये डाऊन पेमेंट भरून ही ई-स्कूटर खरेदी केली तर तुम्हाला 20,000 रुपयांचे लोन बसेल. यातच कर्ज 5 वर्षांसाठी 8% व्याजदराने घेत असाल तर तुम्हाला दरमहा फक्त 406 रुपये EMI भरावा लागेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.