World Lung Cancer Day 2022 : फुफ्साचे आरोग्य राखायचे आहे ? या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा आहारात समावेश करा

फुफ्फुसाची काळजी घेण्यासाठी या आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर करा
World lung cancer day, Lung health, Health tips
World lung cancer day, Lung health, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फुफ्फुसे हे शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी ते निरोगी, स्वच्छ व मजबूत राहणे अधिक महत्त्वाचे आहे.

हे देखील पहा -

दरवर्षा १ ऑगस्टला जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणे होय. याच्या सवयी व घटकांबद्दल लोकांना शिक्षित करणे. फुफ्फुस हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे जो न थांबता सतत काम करतो. फुफ्फुसातून श्वास घेताना प्राणवायू शरीरात प्रवेश करतो, जो शरीराच्या सर्व कार्यांमध्ये महत्त्वाचा असतो.

वाढते प्रदूषण, धूळ, विषाणूंच्या संसर्गामुळे फुफ्फुसे कमकुवत होतात, ज्यामुळे दमा, श्वसनाचे संसर्गजन्य आजार होतात. त्यामुळे फुफ्फुसात कफ जमा होऊन श्वास घेण्यास त्रास होतो. फुफ्फुसांची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पती आहेत ज्याचा वापराने आपण आपण त्याची काळजी घेऊ शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल

World lung cancer day, Lung health, Health tips
Kidney health tips : किडनीचे आरोग्य सांभाळायचे आहे ? तर या पदार्थांपासून दूर रहा

१. पिंपळी फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून श्वसनसंस्थेसाठी फायदेशीर औषध आहे. आयुर्वेदानुसार, पिपंळाचे सेवन वाढत्या क्रमाने केल्यास फायदा होतो. याचे सेवन केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी-खोकल्यासारख्या श्वसनाच्या अनेक समस्येवर मात करता येते.

२. सुंठ किंवा कोरडे आलं खाल्ल्याने फुफ्फुसातील संसर्गामुळे होणारी जळजळ कमी होते. आलं श्वसनमार्ग स्वच्छ ठेवून श्वसोच्छवासाची प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करते. कोरडे आलं, घसा खवखवणे व खोकल्यामध्ये आराम देते व घशाची सूज कमी करण्यास मदत करते.

३. बेहडा हा त्रिफळा या आयुर्वेदिक औषधाचा घटक आहे. कोरडा खोकला, सर्दी आणि घसादुखीवर हे फळ फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार बेहडा सर्व प्रकारच्या खोकला व श्वसनसंस्थेच्या आजारांवर फायदेशीर आहे. तसेच वाढलेला कफ देखील दूर होण्यास मदत होते.

४. तुळशी हे एक अत्यंत गुणकारी औषध आहे ज्याचा उपयोग श्वसनाच्या अनेक आजारांवर फायदेशीर ठरतो. तुळशीच्या पानांमध्ये युजेनॉल आढळते, जे श्वसनसंस्थेतील सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि श्वसनाचे संक्रमण आणि फुफ्फुसाचे इतर अनेक आजार टाळता येतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com