World Mental Health 2022 : आहारात 'हे' पदार्थ नसतील तर, कमजोर होऊ शकते मेंदूचे आरोग्य !

कधीकधी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे मेंदूचे कार्य हे कमकुवकत होते.
World Mental Health 2022
World Mental Health 2022Saam Tv

World Mental Health 2022 : आपला रोजचा आहार हा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानला जातो. त्यासाठी कधीकधी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे मेंदूचे कार्य हे कमकुवकत होते. ज्यामुळे तणाव, नैराश्य, चिडचिड, अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवतात.

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन 2022 जगभरात साजरा केला जात आहे. लोकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. त्यासाठी मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे हे जाणून घेऊया.

World Mental Health 2022
World Mental Health Day: मानसिक आरोग्य उत्तम राखायचे आहे ? तर 'या' टिप्स फॉलो करा, चिंता आणि नैराश्यापासून राहाल दूर

1. जीवनसत्त्व-ड

जीवनसत्त्व (Vitamins) ड हे एड्रेनालाईन, नॉरएड्रेनालाईन आणि डोपामाइनचे उत्पादन नियंत्रित करते आणि मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण हार्मोन्सची भूमिका बजावते. जीवनसत्त्व -ड च्या कमतरतेची लक्षणे विविध पध्दतीने जाणवतात. त्यात थकवा, स्नायू कमकुवत होणे, केस गळणे, पाठदुखी, खराब त्वचेची स्थिती, हाडे दुखणे आणि मूड बदलणे यांचा समावेश होतो. यात जीवनसत्त्व ड ने समृद्ध असलेल्या आहारामध्ये अंडी, फॅटी फिश, मशरूम, ब्राऊन राइस, बकरीच्या दुधापासून बनवलेले चीज आणि ग्लूटेन-मुक्त ओट्स यांचा समावेश असावा.

2. जीवनसत्व-ब

ब जीवनसत्त्वे (B1, B6, B7, B12, B कॉम्प्लेक्स) च्या कमतरतेमुळे नैराश्य, अस्वस्थता आणि लगेच मूड बदलू शकतो. हे मज्जासंस्था तसेच रक्ताभिसरण प्रणालीच्या व्यत्ययाशी संबंधित आहे. B12/B9 किंवा फोलेट मूड स्विंगशी जोडलेले आहे. जे लोक नैराश्याशी लढा देत आहेत त्यांच्या रक्तात फोलेटची कमतरता असते. फोलेट तयार करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, बीन्स, मटार, लिंबूवर्गीय फळे आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा.

World Mental Health 2022
Common Causes of Delay Periods : मासिक पाळी उशीरा का येते ? त्याचे नेमके कारण काय ? जाणून घ्या

3. मॅग्नेशियम

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अस्वस्थता, चिंता, चिडचिड, गोंधळ, निद्रानाश, डोकेदुखी, भ्रम आणि नैराश्य यासारख्या मानसिक विकारांशी संबंधित अनेक लक्षणे वाढतात. ताण कमी करण्यासाठी मॅग्नेशियमयुक्त पदार्थ, जसे की भोपळ्याच्या बिया, डार्क चॉकलेट (Chocolate), आणि बदाम दिवसातून किमान तीन वेळा समाविष्ट केले पाहिजेत.

4. ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्

ओमेगा -3 फॅटी ऍसिड आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी आणि कार्यप्रणालीला चालना देण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ज्यामुळे मेंदूला तीक्ष्ण आणि सकारात्मक मूड बदलवतात. ओमेगा -3 फॅटी ऍसिडच्या कमतरतेच्या लक्षणांमध्ये कमजोरी, विस्मरण, कोरडी त्वचा, हृदयाची समस्या, मूड बदलणे आणि तणाव यांचा समावेश होतो.याची क्षमता वाढवण्यासाठी सॅल्मन किंवा कॉड हे ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे उत्कृष्ट स्रोत आहेत. तसेच अंबाडीच्या बिया आणि अक्रोडात देखील हे आढळतात.

5. प्रोबायोटिक

शरीरातील प्रोबायोटिकची कमतरता ही जगभरात सर्वाधिक वारंवार दुर्लक्षित केली जाते, ज्यामुळे लाखो लोकांमध्ये त्रासदायक लक्षणे दिसून येतात. प्रोबायोटिक्स हे जिवंत बॅक्टेरिया आणि यीस्ट यांचे मिश्रण आहे जे नैसर्गिकरित्या मानवाच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये राहतात आणि तणाव कमी करण्यात मदत करतात, निरोगी पचन, सकारात्मक मूड आणि भावनिक संतुलन वाढवतात.

World Mental Health 2022
Breast Cancer in Men : पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो का ? त्याची लक्षणे कशी दिसून येतात

अस्वास्थ्यकर आतड्यांशी संबंधित मानसिक आरोग्य समस्यांमध्ये ADD/ADHD, चिंता, तणाव, स्किझोफ्रेनिया आणि अल्झायमर रोग यांचा समावेश होतो. शारीरिक समस्यांमध्ये ऑटोइम्यून समस्या (जसे की थायरॉईड आणि संधिवात), पाचन समस्या (जसे की IBS, बद्धकोष्ठता, अतिसार, छातीत जळजळ किंवा पोट फुगणे), झोपेची समस्या, त्वचेवर पुरळ यांचा समावेश होतो. याची कमतरता दूर करण्यासाठी आपण आहारात दही, केफिर, सॉकरक्रॉट, किमची, कोम्बुचा आणि लोणचे यांचा समावेश करु शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com