Worst Foods for Heart : हृदयाला निरोगी ठेवायचे आहे? आहारातल्या या पदार्थांना लगेच करा बाय बाय

Healthy Heart : हृदयाला निरोगी बनवण्यासाठी काही सवयी बदलणे आणि योग्य आहार घेणे गरजेचे असते.
Worst Foods for Heart
Worst Foods for HeartSaam Tv

Heart Care Tips:

आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. शरीरातील प्रत्येक अवयवांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे आपण निरोगी राहू शकतो. कोणाताही योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा अनेक समस्या उद्भवतात.

हृदय हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. जो आपल्या संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्याचे काम करते. त्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयाला निरोगी बनवण्यासाठी काही सवयी बदलणे आणि योग्य आहार घेणे गरजेचे असते. जर तुमच्या काही वाईट सवयी असतील तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जाणून घेऊया आहारातल्या कोणत्या पदार्थांना वगळायला हवे.

Worst Foods for Heart
White Hair Problem : खोबरेल तेलात हा पदार्थ मिसळून लावा, पांढरे केस होतील काळेभोर

1. मांस

हृदय (Heart) निरोगी ठेवायचे असेल तर दररोज मांसाचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला हवे. डेली मीटमध्ये मीठाचे प्रमाण खूप जास्त असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. याचा वापर सॅण्डविचमध्ये अधिक प्रमाणात होतो.

2. फ्रेंच फ्राईज

हल्ली प्रत्येकाच्या आवडचा पदार्थ हा फ्रेंच फ्राईज. बटाट्यापासून बनवलेला हा पदार्थ हृदयासाठी तीनपटीने धोकादायक असतो. त्यात असणारे कार्बोहायड्रेट रक्तातील साखरेची (Sugar) पातळी वाढवते. याशिवाय यात चरबी आणि मीठाचे प्रमाण देखील अतिप्रमाणात असते. ज्यामुळे हृदयाला हानी पोहोचते.

3. सोडा आणि आहार

आजकाल अनेकांना सोडा पिण्याची सवय लागली आहे. उकाड्यात बरेचदा आपण शरीरात थंडपणा टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पितात. हे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामध्ये असणारे इन्सुलिन स्पाइकला प्रोत्साहन मिळते ज्यामुळे वजन वाढणे, जळजळ आणि हृदयविकाराचा (Heart attack) धोका वाढतो.

Worst Foods for Heart
High Cholesterol Food : वाढते कोलेस्ट्रॉल झटकन होईल कमी; या फळांचा आहारात समावेश करा, आठवड्याभरात मिळेल रिजल्ट

4. व्हाइट ब्रेड

तुमच्या आहारातून व्हाइट ब्रेड काढून टाका. व्हाइट ब्रेडमध्ये फायबर, मिनरल्स, फायटोकेमिकल्स आणि हेल्दी फॅट्स नसतात, जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. पांढर्‍या ब्रेडऐवजी तुम्ही संपूर्ण गव्हाची ब्रेड खाऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Worst Foods for Heart
Weight Loss Food : आठवड्याभरात वजन होईल झटक्यात कमी, डाएटमध्ये समावेश करा स्वयंपाकघरातील हे पदार्थ

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com