चीनी कंपनी Xpeng ची इलेक्ट्रिक फ्लाइंग कार; स्पीड ऐकून व्हाल थक्क !

जगभरातील फ्लाइंग कार (X2 Flying Car) निर्मीत कंपन्यांच्या यादीत सामील होत, चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Xpeng ने आपली X2 इलेक्ट्रिक फ्लाइंग कार सादर केली आहे.
चीनी कंपनी Xpeng ची इलेक्ट्रिक फ्लाइंग कार; स्पीड ऐकून व्हाल थक्क !
चीनी कंपनी Xpeng ची इलेक्ट्रिक फ्लाइंग कार; स्पीड ऐकून व्हाल थक्क !Saam Tv

जगभरातील फ्लाइंग कार (X2 Flying Car) निर्मीत कंपन्यांच्या यादीत सामील होत, चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Xpeng ने आपली X2 इलेक्ट्रिक फ्लाइंग कार सादर केली आहे. कंपनीचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झियाओपेंग यांनी चीनी मायक्रोब्लॉगिंगच्या वेबसाइट वर पाचव्या पिढीच्या इलेक्ट्रिक फ्लाइंग कारचे फुटेज शेअर केले आहे. म्हणजेच, Xpeng ची पाचवी पिढी ही फ्लाइंग कार आहे.

Xpeng कार कंपनी 2014 मध्ये सुरु केली असून, त्याचे मुख्यालय गुआंगज मध्ये आहे. गेल्या उन्हाळ्यात न्यूयॅार्क स्टॅाक एक्सचेंजमध्ये 1.5 अब्ज डॅालर गुंतवणूक करुण ही कंपणी सार्वजनिक करण्यात आली होती. कंपनीने 2018 पासून EV-G3 SUV तसेच 2019 मध्ये P7 सेडान लाँच केल्या आहेत.

चीनी कंपनी Xpeng ची इलेक्ट्रिक फ्लाइंग कार; स्पीड ऐकून व्हाल थक्क !
पावसाळ्यातील आरोग्य नीट राखण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

झीओपेंग यांनी वेबसाईटवर शेअर केलेल्या 1.5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये X2 सक्रिय होत असल्याचे दर्शविले गेले आहे. "हे आम्हाला फ्लाइंग कार बनवण्याच्या एक पाऊल पुढे घेऊन जात आहे. जे अधिक सुरक्षितपणे वापरले जाऊ शकते," असे त्यांनी वेबसाईटवर लिहिले आहे. व्हिडिओमध्ये, X2 कोणत्याही मानवी प्रवाश्याशिवाय दूरस्थपणे उड्डाण करतांना दिसत आहे. तथापि, काही अंतरावर उड्डाण केल्यानंतर, नंतर ते सुरक्षितपणे परत जमिनीवर येत आहे.

X2 इलेक्ट्रिक फ्लाइंग कारचे वजन 360 किलो आहे आणि त्याचे कमाल टेकऑफ वजन 560 किलो आहे. त्याच वेळी, या कारची रेंज 35 मिनिटे असून आणि ते जास्तीत जास्त 130 किमी / ताशी वेगाने उड्डाण करू शकते. हे त्याच्या अनेक सेन्सरचा वापर करुण मैदानावर नजर ठेवू शकते आणि कोणत्याही मदतीशिवाय जमिनीवर परत येऊ शकते. याव्यतिरिक्त, त्याच्या वैशिष्ट्यांच्या सूचीमध्ये 100 किमी पेक्षा जास्त द्वि-मार्ग रीअल-टाइम संचार समाविष्ट आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com