
//Amazon Publisher's Services //End of Amazon Publisher's Services Code
अनेकदा आपण चार चौघात बसल्यानंतर हसताना आपले दात पिवळे दिसू लागतात. त्यामुळे आपल्याला हसताना देखील बराच विचार करावा लागतो. दात साफ करण्यासाठी कितीही महागड्या टूथपेस्टचा वापर केला तरी दात हे पिवळेच दिसू लागतात.
डॉक्टरांच्या मते किमान दिवसातून दोन वेळा तरी ब्रश करायला हवा. ज्यामुळे दातात अडकलेले अन्नपदार्थ बाहेर निघण्यास मदत होईल. जर तुमचे दात कितीही घासले आणि तरीही पिवळे दिसत असतील तर स्वयंपाकघरातील चिमूटभर मीठ फायदेशीर ठरेल. याचा वापर कसा करायचा जाणून घेऊया.
1. मीठ (Salt) आणि मोहरीचे तेल
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी मीठ फायदेशीर ठरू शकते. चिमूटभर मीठ घ्या. आता त्यात एक चमचा मोहरीचे तेल घाला. हे मिश्रण बोटावर घेऊन दात घासा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. असे नियमितपणे केल्यास दातांवर साचलेली घाण नाहीशी होईल आणि दात चमकण्यास सुरुवात होईल.
2. मीठ आणि बेकिंग सोडा
दातांवरील पिवळसरपणा दूर करण्यासाठी मीठ आणि बेकिंग सोडा वापरू शकता . यासाठी 2 चिमूट मीठामध्ये (teeth) एक चिमूटभर बेकिंग सोडा मिसळा. हे दातांवर लावा. २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने ब्रशने दात स्वच्छ करा, त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. श्वासाची दुर्गंधी कमी होईल.
3. मीठ आणि लिंबाचा रस
दातांचा पिवळसरपणा साफ करण्यासाठी तुम्ही मीठासोबत लिंबाच्या रसाचा वापर करु शकता. यासाठी चिमूटभर मीठात 3-4 थेंब लिंबाचा रस आणि थोडे पाणी घाला. आता ही पेस्ट बोटात घेऊन दातांवर घासून घ्या. नंतर पाण्याने (Water) स्वच्छ धुवा. आठवड्यातून 1 ते 2 वेळा याचा वापर केल्याने तुमचे दात चमकदार होतील.
4. मीठ आणि आले
दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही आलं मीठ मिसळून वापरू शकता. यासाठी चिमूटभर मीठात आले पावडर आणि मध घाला. आता ही पेस्ट दातांना लावा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे श्वासाच्या दुर्गंधीपासूनही सुटका मिळू शकते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.