Yoga to Reduce Cholesterol : वाढलेल्या कोलेस्ट्रॉलला या योगसनांनी नियंत्रणात आणा, आरोग्यही सुधारेल आणि वजनही होईल कमी

शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
Yoga to Reduce Cholesterol, Health tips
Yoga to Reduce Cholesterol, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yoga to Reduce Cholesterol : शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी किती घातक आहे हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे.

हे देखील पहा -

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे आपल्या हृदयाला धोका वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, कोलेस्टेरॉल हे शरीरातील मेणासारखे असते. त्याची पातळी नियंत्रणात असली तर आपल्याला आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाही. परंतु, याची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यास त्याचा सर्वात जास्त परिणाम हा हृदयावर होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी चांगल्या आहारासोबतच पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. जर आपण नियमितपणे योगासने केल्यास आपल्याला आपला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी योग

१. वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वांगासन योग फायदेशीर (Benefits) ठरते. या प्रकारचा योगासने केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करता येते. हे करण्यासाठी, पाय मागे वर उचला आणि संपूर्ण भार खांद्यावर, डोके आणि कोपरांवर ठेवा. हर्नियाची समस्या, दुखापत, थायरॉईड आणि हृदयाच्या समस्या असल्यास हे आसन करू नये.

Yoga to Reduce Cholesterol, Health tips
Health tips : बीएमआयवरून स्‍नायूच्‍या आरोग्‍याचे मापन कसे कराल ? जाणून घ्या

२. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी पश्चिमोत्तासन खूप चांगले आहे. हे करण्यासाठी, पाय सरळ करून बसा. नंतर श्वास सोडताना हळू हळू पुढे वाकवा. काही सेकंदांनंतर सरळ व्हा. ऑपरेशन, जुलाब, गर्भधारणा, दमा आणि स्लिप डिस्कची समस्या असल्यास हे आसन करू नये.

३. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कपालभाती हा योग (Yoga) खूप फायदेशीर आहे. तसेच लठ्ठपणावर नियंत्रण ठेवते. हे करण्यासाठी, ताठ बसून दीर्घ श्वास घेताना, पोट आतल्या बाजूला खेचा. हे सतत करा आणि थकवा आल्यावर थांबा. हे आसन तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करा. रक्तदाब, मायग्रेन, गर्भधारणा आणि मासिक पाळी दरम्यान कपालभाती प्राणायाम टाळावा.

ही योगासने नियमित केल्याने आपल्याला अनेक कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवता येईल तसेच, वजन ही नियंत्रणात ठेवता येईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com