ऑफिस टीमशी मैत्री करुन, असे करा एकत्रित काम

नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
How to make friends in office, work etiquette
How to make friends in office, work etiquetteब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : करिअरच्या (Career) प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्त करण्यासाठी आपल्या अधिक मेहनत घेणे आवश्यक असते. परंतु, व्यावसायिक जीवनात फक्त मेहनत घेणे इतकच आवश्यक नाही. नोकरीच्या ठिकाणी आपण बहुतेक वेळा एका टीममध्ये काम करत असतो आणि अशावेळी फक्त एकट्याने पुढे जाऊन चालत नाही. अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करत पुढे जाणे कधीही चांगले असते. नोकरीमध्ये (Job) प्रमोशन मिळवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यावसायिक जीवनात प्रगती मिळवण्यासाठी कधीकधी कष्ट करुनही यश सहज मिळत नाही. ऑफिसमध्ये काम करताना आपण सर्वजण अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्याचा परिणाम आपल्या करिअरवर होऊ लागतो. ऑफिसमध्ये होणार्‍या सामान्य चुका समजून घेऊन, त्यातून बोध घेणे कधीही चांगले.

हे देखील पहा -

आजच्या युगात स्पर्धेची पातळी खूप वरची आहे. अनेक वेळा हे पाहता एकमेकांच्या पुढे जाण्याच्या शर्यतीत आपण आपल्या कार्यालयीन कर्मचारीसोबत नैतिकताही विसरत जातो. परंतु, त्याचा आपला करिअरवर परिणाम होऊ लागतो. आपण सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असलो तरी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

ऑफिसमध्ये काम करताना या गोष्टींची काळजी घ्या.

१. व्यावसायिक जीवनात नेहमी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. कोणतीही गोष्टी समजत नसेल तर ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. गरज पडल्यास आपल्या सहकर्मचारी, वरिष्ठ किंवा कनिष्ठ यांना विचारण्यास अजिबात संकोच करू नका.

How to make friends in office, work etiquette
दीर्घकाळ पनीर टिकवण्यासाठी हे उपाय नक्की करा.

२. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर सतत कामात व्यस्त राहू नका. कोणाशीही न बोलता नुसते कामात व्यस्त राहिला तर ते तुमच्यासाठी खूप नकारात्मक असू शकते. आपल्या सहकर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तयार रहा.

३. काम वेळेवर करा. अधिक वेळ ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करून, बॉसच्या गुड बुक्समध्ये येण्याचा प्रयत्न करत असाल तर काहीवेळा त्याचे परिणाम उलटे असू शकतात. काही वेळा आपल्या बॉस किंवा वरिष्ठ कर्मचाऱ्यांना असे वाटू शकते की, आपण कामाबद्दल गंभीर नाही किंवा आपण आपले काम वेळेवर पूर्ण करू शकत नाही.

४. ऑफिसमध्ये जर तुम्ही फक्त स्वतःच्या आर्थिक वाढीचा विचार करून काम करत असाल तर त्याचा फायदा होणार नाही. कोणतेही काम करताना आपल्या संपूर्ण टीमला सोबत घेऊन काम करणे कधी चांगले असते. असे केले नाही तर आपण कामात यशस्वी होणे खूप कठीण आहे. आपले काम वेळेत पूर्ण करण्यासोबतच इतरांनाही मदत करा.

५. आपण जर एकाच टीममध्ये काम करत असू तर एकमेकांच्या कामाबद्दल प्रोत्साहन द्या. एकमेकांचे काम समजून घेऊन त्यांना त्यांच्या कामात देखील मदत करा यामुळे आपले ज्ञान वाढेल आणि कामही लवकर होईल.

अशाप्रकारे तुम्ही आपल्या सहकर्मचाऱ्याशी मैत्री (Friends) करून काम करू शकता.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com