नंदुरबार शहर परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी

दिनू गावित
शुक्रवार, 6 मार्च 2020

राज्यात अवकाळीचा कहर सुरूच आहे. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.या पावसामुळे कापणीला आलेला गव्हाचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. 

नंदुरबार : शहरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास दहा मिनिटे पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. शहरासह तळोदा परिसरातही शिडकावा झाला. यामुळे तापमानात घट झाली असून त्याचा फायदा उशीरा पेरणी केलेल्या गव्हाला होणार आहे. मात्र जोरदार पाऊस झाल्यास कापणीला आलेला गव्हाचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. 

शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून हवेत गारठा वाढला होता. त्यामुळे पावसाच्या शक्‍यतेने शेतकऱ्यांच्या मनात भिती होती. दरम्यान सकाळपासून असलेले धोक्‍याचे वातावरण निवडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. गेल्या पाच- दिवसांपासून जळगाव, धुळे व नंदुरबार परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहण्यास मिळत आहे. गुरूवारी (ता.5) देखील ढगाळ वातावरण असल्याने पाऊस येण्याची शक्‍यता वाटत होती. मात्र उन सावल्यांचा खेळ दिवसभर चालला. 

हेही वाचा- परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस

नंदुरबारमध्ये पहाटेच सरी 
नंदुरबार शहर व परिसरात रात्रीपासून काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते. यात सकाळी साडेसातच्या सुमारास पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. यामुळे वातावरणात पुन्हा गारवा निर्माण होवून थंडी जाणवू लागली आहे. पावसाच्या हलक्‍या सरी गहू, हरभऱ्यासाठी फायद्याच्या असल्या; तरी जोरदार पाऊस झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची भिती अधिक आहे. 

दोन दिवसांपुर्वी भडगाव परिसरात 
मागील दोन दिवसांपुर्वी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. काही र्िठकाणी हलकीशी गारपीट झाली होती. यामुळे गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. 

 

WEB TITLE- Light rains in Nandurbar city area


संबंधित बातम्या

Saam TV Live