तासंतास उन्हात रांगेत ताटकळून तळीरामांनी 43.75 कोटींचा व्यवसाय दिला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 मे 2020

एकाच दिवशी 12.50 लाख लिटर म्हणजे 43.75 कोटी रुपयांची मद्यविक्री झाली.

राज्यात 4 एप्रिलला मद्यविक्री सुरू करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (ता. 6) एकाच दिवशी 12.50 लाख लिटर म्हणजे 43.75 कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. एकूण 36 जिल्ह्यांपैकी फक्त 18 जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री होऊ शकली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अन्य जिल्ह्यांत मद्यविक्री बंद ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये लवकरच मद्यविक्री सुरू होण्याचे संकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले.

राज्यातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर हे दारूबंदी जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये सशर्त मद्यविक्री सुरू झाली आहे. लॉकडाऊनदरम्यान शेजारील राज्यांतून होणारी मद्यतस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व विभागीय उपायुक्त व अधीक्षकांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. एकूण 12 सीमा तपासणी नाक्‍यांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली होती. या पथकांनी मंगळवारी राज्यात 121 गुन्हे नोंदवून 62 आरोपींना अटक केली आणि 29.80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

काही जिल्ह्यांतील मद्यविक्री पुन्हा बंद करण्यात आल्यामुळे देशी मद्याची 75 व विदेशी मद्याची 364 दुकाने; तसेच 137 बिअर शॉप बंद आहेत.

या जिल्ह्यांत दारूची दुकाने खुली

ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, भंडारा, बुलडाणा, नाशिक, यवतमाळ, अकोला, वाशिम.

या जिल्ह्यांत दारूची दुकाने बंद
सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, गोंदिया.

मद्यविक्री सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद
मुंबई शहर, मुंबई उपगनर, उस्मानाबाद, लातूर.

सध्याची स्थिती आकड्यांत (मद्याचा प्रकार, एकूण दुकाने, सुरू दुकाने या क्रमाने)
देशी मद्य- 4159 (1036) 

विदेशी मद्य -1685 (354)

बियर शॉप- 4947 (1576)

वाईन शॉप 31 (1)


संबंधित बातम्या

Saam TV Live