राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही

रामनाथ दवणे
शनिवार, 22 मे 2021

विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 12 जणांच्या नावांची शिफारस केलेली यादी राज्यपाल सचिवालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाला दिली आहे. 

विधान परिषदेवर Legislative Council नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने State Cabinet 12 जणांच्या नावांची शिफारस केलेली यादी राज्यपाल सचिवालयात Governor's Secretariat उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय Right to Information कार्यकर्ते अनिल गलगली Anil Galgali यांनी राज्यपाल सचिवालयाला दिली आहे. The list of nominated members of the Legislative Council is not available 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे आज माहिती विचारली होती की, मुख्यमंत्री महोदय/ मुख्यमंत्री सचिवालय तर्फे राज्यपाल नामीत विधान परिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेली यादी List देण्यात यावी.

हे देखील पहा -

तसेच मुख्यमंत्री CM महोदय/ मुख्यमंत्री सचिवालय तर्फे राज्यपाल नामीत विधान परिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी. अनिल गलगली यांच्या अर्जावर 19 मे 2021 रोजी राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी उत्तर देत कळविले की राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची यादी जन माहिती अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने, आपणांस उपलब्ध करुन देता येत नाही. The list of nominated members of the Legislative Council is not available 

शेतकऱ्याने वीस गुंठयातून घेतले करलीचे भरघोस उत्पन्न; मात्र टाळेबंदी मुळे भावच नाही

अनिल गलगली यांनी संभ्रमित करणाऱ्या माहिती बाबत प्रथम अपील दाखल केले आहे. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री सांगतात की यादी पाठविली आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री सचिवालयाने यादी देण्यास यासाठी नकार दिला होता की अजून अंतिम निर्णय झाला नाही आणि आता राज्यपाल सचिवालय वेगळेच उत्तर देत आहे. अनिल गलगली यांचे म्हणणे आहे कि खरोखरच यादी पाठविली असेल तर मुख्यमंत्री सचिवालय आणि राज्यपाल सचिवालय यापैकी एकाने माहिती सार्वजनिक करावी. राज्यपालांने यादी असल्यास त्यावर होय किंवा नाही, असा एकतरी निर्णय घेत कोंडी सोडवावी.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live