या कारणामुळे मुंबई लोकल बंद होऊ शकते...

साम टीव्ही
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

मुंबईभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाकारण्यात येणार की काय? अशी चर्चा सुरू झालीय पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून.

सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलमध्ये प्रवेश देण्यास सुरूवात झालीय. मात्र मुंबईकर लोकलमध्ये गर्दी करतायत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाहीयत आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक प्रवासी मास्कचाही वापर करत नसल्याचं समोर आलंय. त्यातच मुंबईभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाकारण्यात येणार की काय? अशी चर्चा सुरू झालीय पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून.

मुंबई शहरात आणि लोकलमध्ये विनामास्क फिरणारी ही लोकं पाहा. ही लोकं मुंबईकरांचे मारेकरी आहेत. मास्क न लावता फिरणारे कोरोनाचे वाहक ठरताय़त. १ फेब्रुवारीपासून सामान्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली. लोकल सुरु झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली आणि प्रवाशांचा निष्काळजीपणाही वाढला. गेल्या दोन आठवड्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली. मुंबईसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातही कोरोना रुग्णसंख्या वाढली. त्यामुळं महापालिका आता सामान्यांसाठी लोकलसेवा बंद ठेवावी का या विचारात आहे. 

 जवळपास १० महिने लोकल सामान्यांसाठी बंद होती. लोकल जेव्हा सुरु झाली तेव्हा कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं होतं. पण या नियमांकडं प्रवाशांनीच दुर्लक्ष केलंय. विनामास्क फिरुन मुंबईकरांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा हा प्रकार केलाय.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live