कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे उडाला रंग उद्योगाचाच रंग!

Paints Industry Facing Problems due to lock down
Paints Industry Facing Problems due to lock down

कोरोनाच्या Corona प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी जवळपास दोन महिने रंग उद्योग आणि व्यवसाय ठप्प होता. मॅन्युफॅक्‍चरिंग Manufacturing उद्योगासाठी कच्च्या मालाचा पुरवठा हा कळीचा घटक असतो. पेंटमध्ये Paint निरनिराळ्या कच्च्या मालाचे मिश्रण केले जाते. त्यांची संख्या तिनशेवर आहे. लॉकडाऊन Lock Down आणि त्यानंतर रंगाच्या मागणीतली घट, तेजीतील कच्चा माल, पुरवठ्यातील अनिश्‍चितता अशा अनेक कारणांमुळे रंग निर्मिती उद्योग अस्तित्वाचा लढा देतो आहे. त्याच्या समस्यांबाबत केलेला उहापोह. Lock Down and Corona Made Colour Industry Crippled

कोरोनाची महामारी Corona आणि लॉकडाऊनमुळे पेंट व कोटिंग्ज उद्योगाची मोठी आर्थिक हानी झाली. व्यवसाय व मागणी घटणे, मनुष्यबळाची कमतरता, इंधन दरवाढ Fule Price Hike अशा समस्यांना रंग उद्योग सामोरे जात होता. मिशन अनलॉक Mission Unlock अंतर्गत योग्य त्या खबरदारीनिशी उद्योगाचे कामकाज हळूहळू पूर्ववत झाले. परंतु आता पुन्हा व्यावसायिक आणि उत्पादकांना रंगाच्या कच्च्या मालाच्या दुप्पट दरवाढीमुळे आणि अनियमित उपलब्धता, कमतरतेमुळे संकटाचा सामना करावा लागतोय. सरासरी कच्च्या मालाचे प्रमाण निव्वळ विक्रीमध्ये (उद्योग सरासरी) 60%असते. अगदी छोट्या युनिटबाबतीत ती 70 टक्‍क्‍यांपर्यंत असते.

कच्च्या मालाचा Raw Material पुरवठा काहीना काही कारणांनी वारंवार कमी किंवा अनियमित होतो. अंदाज आहे की, उद्योगातल्या एकूण कच्च्या मालापैकी 25% आयात होतो. पेंट्‌सच्या किंमती मोठ्या प्रमाणात त्याच्या किंमतीवर अवलंबून असतात. निर्मितीसाठी टायटॅनियम डायऑक्‍साइड, फाथेलिक ऍनाहाइड्राइड,पेंटरिथ्रिथोल, इपॉक्‍सी रेझिन, आल्किड रेझिन, टरपेन्टाईन, ऍक्रेलिक इमल्शन इत्यादी प्रमुख कच्च्या मालाचे एकूण खर्चाच्या जवळपास 50 टक्के रक्कम असते. केवळ टायटॅनियम डायऑक्‍साईडवरच 30टक्के खर्च होतो. इतर कच्चा माल जसे की एरंडेल, सोयाबीन तेले इत्यादी संपूर्ण किंमतीच्या 20% खर्च करतात आणि कच्च्या मालाच्या किंमतीतील कोणतेही चढउतार कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम करतात.

1) कच्च्या तेलाचे भाव : मोनोमेर्स आणि सॉल्व्हेंट्‌ससारख्या तेलावर आधारित कच्चा माल आणि तेलाशी संबंधित डेरिव्हेटिव्हजच्या वाढीव किंमतीमुळे भारतीय पेंट उत्पादकांवर दबाव निर्माण झाला आणि अजूनही हे दर स्थिर नाहीत. मुख्य कच्चा माल पेट्रोलियम आधारित डेरिव्हेटिव्ह असतात. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत कोणताही बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम कच्च्या मालावर होतो, पर्यायाने रंगाचे भाव वाढतात. दोन-तीन वर्षांत कंपन्यांच्या मार्जिनला त्यामुळे फटका बसला आहे.
2) परकी चलन आणि विनिमय दर :  आयाती कच्च्या माल जसे एपिक्‍लोराइड्रिन आणि पेंटॅरिथ्रिटोल, थेलीक अनहायड्राईड व इतर प्रमुख कच्चा मालाचे भाव रुपया-डॉलर विनिमय दरावर अवलंबून असतात. 2020 आणि चालू वर्षात, आयाती रुटाईल टीआयओच्या किंमतीही लक्षणीय वाढल्या आहेत. मागील वर्षातला त्याचा दर 162 रुपयांवरून आता 240 रुपयांपर्यंत पोहचला आहे. Lock Down and Corona Made Colour Industry Crippled

3) कार्यशील भांडवल : वेगवेगळ्या प्रकारच्या पेंट्‌स बनवण्यासाठी कच्च्या मालाची वाढीव किंमत आणि अनियमित उपलब्धतेमुळे प्रचंड कार्यशील भांडवल Capital आवश्‍यक आहे. कच्चा माल वधारतो तेव्हा त्यांच्याकडे किंमती वाढविण्याशिवाय पर्यायच नसतो.

4) आयाती माल आणि उत्पादकांवर अवलंबन : रंग उद्योगासाठी प्रमुख कच्चा माल अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, चीन, कोरिया, जपान, फ्रान्स, स्पेन इत्यादी देशातून आयात होतो. त्याचे ठराविक उत्पादकांकडूनच उत्पादन होत असल्याने देशातल्या रंग उद्योजकांना त्यांच्या अटी, शर्तीवर अवलंबून राहावे लागते. आर्किटेक्‍चरल पेंट युनिट्‌सच्या तुलनेत, कच्च्या मालाच्या किंमतींच्या तीव्र वाढीमुळे औद्योगिक कोटिंग उत्पादकांना त्रास होतो. वर्षभर या कोटिंग उत्पादकांना फटका बसला आहे.

कोरोनामुळे भारतातील पेंट उद्योगास Paint Industry रिअल इस्टेट Real Estate आणि वाहन उद्योगाकडून Automobile Industry मागणी घटली. कच्च्या खनिज तेलाच्या किंमतीत वाढ आणि विदेशी चलनातील चढउताराचा सामना करावा लागत आहे. आर्थिक गणित बिघडले आहे. व्यवसायिकांना ब्रेक इव्हन पॉईंट (ना नफा, ना तोटा) गाठता येत नाही. काही उत्पादक, उत्पादन थांबवायचे की चालू ठेवायचे या विचारात आहेत. Lock Down and Corona Made Colour Industry Crippled

लाखोंच्या संसाराचा प्रश्‍न!
पुणे आणि परिसरात दोनशेपेक्षा अधिक लघु रंग उद्योजक, तीन हजारांवर वितरक, इंजिनियरींग व वाहन उद्योग कंपन्यांच्या पेंट शॉपच्या पाच हजारांवर कर्मचारी तथा कामगार, रंग कंत्राटदार, कच्च्या मालाचे वितरक असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या 50 हजारपेक्षा अधिक व्यवसायिक रंग उद्योगाशी निगडित आहेत.

महाराष्ट्रात तीन हजारपेक्षा अधिक रंग कारखान्यात आणि इंजिनियरींग व वाहन उद्योगांच्या पेंट शॉपमध्ये सुमारे 15 ते 20 हजार कामगार आणि कर्मचारी आहेत. भारतात साधारणपणे रंग उद्योगाशी निगडीत चार लाखांपेक्षा अधिक व्यवसायिकांवर कच्च्या मालाचा परिणाम होतो. एकुणात सुमारे 16 लाख कुटुंबावर या उद्योगातील चढ-उतारचा परिणाम होतो. Lock Down and Corona Made Colour Industry Crippled

इंडियन स्मॉल स्केल पेंट असोशिएशनच्या (आयएसएसपीए) महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिरीष पोंक्षे यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळात भारतातील पेंट उद्योगास रिअल इस्टेट आणि वाहन उद्योगातून मागणी घटलेली, कच्च्या मालाच्या दरातील तेजीने अनिश्‍चितता आहे. वितरक संजय राठोरे म्हणाले की, सध्याची स्थिती लहान आणि मध्यम रंग उत्पादक आणि कच्च्या मालाच्या वितरकांसाठी अत्यंत अवघड आहे. मालाचे उच्च दर असूनही उपलब्धता ही मोठी समस्या आहे.

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com