Big Breaking नंदूरबारमध्ये १ ते १५ एप्रील दरम्यान पूर्ण संचारबंदी

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 27 मार्च 2021

नंदुरबार जिल्ह्यात ०१ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान पुर्णत संचारबंदी लागु करण्याचा जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी आदेश दिला आहे. या अगोदर पंधरा दिवसांपासुन सायंकाळी सात ते सकाळी सहा पर्यत शहरी भागात संचारबंदी सुरु होती. 

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यात ०१ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान पुर्णत संचारबंदी लागु करण्याचा जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला आहे. या अगोदर पंधरा दिवसांपासुन सायंकाळी सात ते सकाळी सहा पर्यत शहरी भागात संचारबंदी सुरु होती. तर आठवड्याचा प्रत्येक शनिवार आणि रविवार दिवशी या शहरी भागात जनता कर्फ्यु लावला जात आहे. (Lock Down orders issued in Nadurbar District Due to Rising Cases of Corona)

नंदुरबारमधील कोरोना (Corona) संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या बघता १६५६६  एवढा टप्पा गाठला आहे. तर आत्ता पर्यत २७५ जण कोरोना आजारामुळे मृत्युमुखी पडले आहेत. या महिन्यामध्ये ८ मार्च पासुन आता पर्यंत ५७४८ कोरोणा बाधीत झालेल्यांमध्ये वाढ झाली तर, या दरम्यान ५२ लोकांचे कोरोना मुळे मृत्यु झाले आहेत. 

आता या पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या निर्णयात अत्यावश्यक खरेदीसाठी नियम व अटी घालुन दोन तीन तासांची परवानगी वगळता याची देखील कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे. कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी नागरिकांनी पॅनिक न होता संचार बंदी चे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे.(Lock Down orders issued in Nadurbar District Due to Rising Cases of Corona)

पंढरपुर मध्येही दोन दिवसांचा लाॅकडाऊन 

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव नियंत्रित करण्याच्या हेतूने जिल्हा प्रशासनाने सोलापूर सह (Solapur) पंढरपुरात (Pandharpur) शनिवार आणि रविवार या दिवशी दोन दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतला.  लॉकडाऊनच्या दोन दिवसात शहरातील व मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. लॉकडाऊन ला प्रतिसाद देत शहरातील रस्त्यावर व मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखिल आज पासून सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजे पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याचा परिणाम कोरोना आकडेवारी कमी करण्यास होईल अशी अपेक्षा केली जात आहे. 

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live