तुघलडी लॉकडाऊन करा, घंटी वाजवा आणि देवाची प्रार्थना करा...

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : तुघलडी लॉकडाऊन Lockdown करा, घंटी वाजवा आणि देवाची प्रार्थना करा, हेच केंद्र सरकारचे लॉकडाऊन विरोधातील धोरण आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी Rahul Gandhi हे आज बरसले.Lock down, ring the bell and pray to God, Rahul Gandhi's attack on Modi Government

देशात वाढत्या कोणता रुग्णसंख्येमुळे त्यांनी आज ट्विटद Twitter केले आहे. कोरोनाला रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस Congress नेते करीत आहेत. राहुल यांनी कालही ट्विट करून टीका केली होती. ‘ना टेस्ट केल्या जात, ना रुग्णालयात बेड आहे, वा व्हेंटिलेटर आहेत. ऑक्सिहनी नाही आणि लसही नाही. फक्त लसीकरण उत्सवाचे ढोंग आहे,’ अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. 

विधानसभा निवडणुकांचा Elections प्रचारातही  कॉंग्रेसकडून Indian National Congress मोदी सरकारवर टीका केली जात आहे. त्यात विशेष करून कोरोनाच्या Corona परिस्थितीचा दाखला देऊन टीका केली जात आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये West Bengal एका सभेत राहुल यांनी, हे मोदी सरकार नाही, तर दोन- तीन उद्योगपतींचे सरकार आहे, असे म्हटले होते. भारतात लसीचा तुटवडा असल्याचे कारण देत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी Soniya Gandhi, सरचिटणीस प्रियांका वद्रा Priyanka Gandhi Wadra आणि राहुल गांधी यांनी लस निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली होती.Lock down, ring the bell and pray to God, Rahul Gandhi's attack on Modi Government

प्रियांका यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधी त्यांनी ट्विट केले असून, त्यात म्हटले आहे, की आपल्या प्रत्येकाचे प्रियजन, परिवारातील Family व्यक्तींना कोरोनचा संसर्ग होतो आहे. त्यामुळे कोरोना संबंधी सुरक्षेची सर्व काळजी घ्या, मास्क लावा. आपल्या सर्वांना मिळून कोरोनाविरोधातील लढ्यात जिंकावे लागेल.

Edited by- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com