नागपुरात पुन्हा लॅाकडाऊन , पालक मंञी नितीन राऊत यांची घोषणा

साम टीव्ही
सोमवार, 15 मार्च 2021

कोरोनाचा वाढता प्रादू्र्भाव पाहता नागपूरचे पालक मंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनची घोषणा केली पत्रकार परिषद घेऊन नागपूर मध्ये लॉकडाऊन होईल अस जाहीर केलाय

कोरोनाचा वाढता प्रादू्र्भाव पाहता नागपूरचे पालक मंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनची घोषणा केली पत्रकार परिषद घेऊन नागपूर मध्ये लॉकडाऊन होईल अस जाहीर केलाय आजपासून २१ मार्च पर्यंत हे लॉकडऊन असणार आहे या आधी नागपूर मध्ये मिनी लॉकडऊन लावण्यात आलं होत मिनी लॉकडऊन हे 14 तारखे पर्यंत होत मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं त्यामूळे  नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन नागपूर मध्ये कडक संचारबंदीची घोषणा केली

 १५ ते २१ मार्च असे सात दिवस हा लॉकडाऊन राहणार आहे हे लॉकडऊन पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रापूरत मर्यादीत असणार आहे  पूर्णपणे सक्तीने लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार, बॉर्डर्स सील केल्या जाणार आहेत त्याच बरोबर अनेक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी देखील केली जाणार आहे ह्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद राहतील भाजी, दूध, दवाखाने, बँक, मीडिया या सेवा देखील सुरु राहतील. सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील मात्र  मद्य विक्री बंद राहील.

नागपूर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालक मंत्र्यांनी नागपूर जिल्ह्यात पून्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलायं नागपूरच नाही तर ग्रामीण भागांमध्ये देखील कोरोनाचे रूग्ण आढळूण येत आहे त्यामूळे १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान नागपूर मध्ये कडक संचारबंदी असणार आहे.नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १७१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही अनेक बेजबाबदार लोक मास्क घालायला तयार नाही म्हणूनच नागपूर मध्ये सात दिवस कडक संचारबंदी असणार आहे.
                                                                   

                                                                            सिद्धी चासकर

                                                                                        


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live