राज्यात पुन्हा लॉकडाऊन? वाढते कोरोना रुग्ण पाहता, आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे ताळेबंदीचे संकेत

साम टीव्ही
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची बैठक
  • वाढत्या रुग्णसंख्येमुळे मोठे निर्णय घेणार?
  • विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक
  • बैठकीत कोरोना रुग्ण संख्या रोखण्याबाबत चर्चा

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होतेय. या संदर्भात आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी येत्या काळात अधिक कडक निर्बंध लावले जाऊ शकतात या संदर्भात सुचित केलंय. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 4 वाजता मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावलीय. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे हे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत वीसीद्वारे संवाद साधणार आहेत. त्यामुळे या बैठकित काही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

पाहा, सविस्तर माहिती -

राज्यात पुन्हा लॉकडाऊनसारखा निर्णय घ्यावा लागेल असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट झालीय. शहरांसह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. ही चिंताजनक बाब असल्याचं सरकारनं सांगितलंय. लोक कोरोनाचे नियम पाळत नसल्यानं कठोर निर्णय घ्यावे लागतील असं पवार म्हणालेत. 

पाहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आलेत.

हेही वाचा -

दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा नाही?

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं अकोला शहर आणि जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागाकरिता संचारबंदीचे आदेश पारीत करण्यात आलेत. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावानं एकत्र येण्यास बंदी करण्यात आलीय. धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, लग्न, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामुहिक कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ 50 व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक किंवा रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आलाय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live