देशात आता 30 जूनपर्यंत लॉकडाऊन, वाचा काय आहेत नवीन लॉकडाऊनच्या नियमावली...

साम टीव्ही
शनिवार, 30 मे 2020

पाचव्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. नवीन सूचना केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आल्यात. कंटेनमेंट झोनबाहेर सरकारकडून नियम शिथिल करण्यात आलेत. कंटेमेंट झोन वगळून 8 जून पासून हॉटेल, धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल उघडी राहणार आहेत.

देशात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. पाचव्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. नवीन सूचना केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आल्यात. कंटेनमेंट झोनबाहेर सरकारकडून नियम शिथिल करण्यात आलेत. कंटेमेंट झोन वगळून 8 जून पासून हॉटेल, धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल उघडी राहणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयांचा निर्णय केंद्र सरकारनं राज्य सरकारवर सोडलाय. 

LOCKDOWN 5.0 | देशात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला, पाहा कोणत्या वेळात असेल कर्फ्यू

दरम्यान सर्वात जास्त मुंबईत कोरोना रुग्ण वाढतायत याच पार्श्वभूमीवर राज्य सराकरनं एक निर्णय घेतलाय. मुंबईत कोरोना रुग्णांसाठी आठवडाभरात ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिलीय.

गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहीसर, भायखळा इथल्या कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. येत्या एक ते दोन दिवसात गोरेगाव आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरील कोविड सेंटर कार्यान्वित होतील असंही त्यांनी सांगितलंय. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या निर्णयामुळे ५३ मोठ्या रुग्णालयातील सुमारे १२ हजार खाटा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलंय. या विषाणूने आतापर्यंत 3 लाख 66 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 60 लाखांवर पोहोचली असून आतापर्यंत 26 लाख 56 हजार रुग्ण बरे झालेत. जगातील जवळपास सर्व प्रमुख देश आजच्या घडीला या विषाणूविरोधात लढत आहेत. तसंच कोरोनाला रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलंय. त्यातच आता भारताची परिस्थिती जास्त बिघडू नये म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live