#lockdownindia | संचारबंदी लागू आहे, घरात पळा! नडला की फोडला, पोलिसांचं धोरण

ब्युरो रिपोर्ट
मंगळवार, 24 मार्च 2020

राज्यात संचारबंदी असतनाही काही अतिउत्साही माणसं घराबाहेर पडताना दिसत आहेत. या विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिस चांगलाच चोप देत आहेत.

सांगली - सांगली पोलिसांनी समाजासाठी घातक असणाऱ्या नागरिकांना पकडलंय. सोमवारी रात्री कुपवाड जत भागात संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांच्या हातात पोलिसांनी 'मै समाज का दुष्मन हु, मै घर पर नही रहूंगा' अशा आशयाचे पोस्टर दिलेत. या कल्पनेमुळे नागरिकांना कमी पणा वाटू लागल्याने त्यांनी घराबाहेर न पडण्याचं ठरवलं आहे. सांगली पोलिसांच्या या आयडियाच्या कल्पनेमुळे त्यांचं कौतुक होतंय. नागरिकांना समजवणं कठीण गेल्याने पोलिसांनी ही नामी शक्कल लढवली आहे.

संचारबंदीतही मिरजेत गर्दी

संचारबंदी असतांनाही ठिकठिकाणी लोकं गर्दी करतायत. मिरजेतही संचार बंदी लागू असतानाही नागरिक, खरेदीसाठी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं... त्यामुळे पोलिस आणि महापालिका प्रशासनानं इथं भाजीपाला विक्री बंद केली... तसंच यावेळी मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप देऊन उठाबशा काढण्यास सांगितलं. तर विनाकारण फिरणाऱ्या  तरुणांना पोलिसांनी चोप दिला. दरम्यान मिरजेतील होम कॉरन्टाइन  केलेली महिला बाहेर फिरत होती, त्यामुळे महापालिका प्रशासनानं तिला  इन्स्टिट्यूट कॉरन्टाइन केलंय.

राज्यात संचारबंदी असतनाही काही अतिउत्साही माणसं घराबाहेर पडताना दिसत आहेत. या विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिस चांगलाच चोप देत आहेत. पुण्यातही पोलिसांनी संचारबंदी दरम्यान घराबाहेर फिरणाऱ्या नागिरकांना चोप दिला आहे. तर तिकडे शेजारील पिंपरीमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. नागपूरमध्ये देखील रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांना चोप दिला आहे. उल्हासनगरमध्ये सोमवारी संध्याकाळी भरचौकात अतिशाहण्या लोकांना पोलिसी खाक्या दाखवलाय. शहापूरमध्ये देखील पोलिसी खाक्या दाखवत संचारबंदीत फिरणाऱ्या नागरिकांना चोप दिला आहे.

अतिउत्साही लोकांना पोकळ बांबूचे फटके

राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी दरम्यान पोलिसांनी नागरिकांवर दंडुका चालवलाय. संचाबंदीतही अतिशाहण्या लोकांना पोलिस चांगलाच चोप देताना दिसतायेत. पालघरमध्ये भरदिवसा पोलिसांनी संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा दिलीये. तर औरंगाबाद शहरातही अतिशाहण्या लोकांना पोलिसांनी आपला हिसका दाखवलाय. तर तिकडे नांदेडमध्ये सोमवारी रात्री विनाकारण फिरणाऱ्या हूल्लडबाजांना पोलिसी खाक्या दाखवला आहे. सांगलीमध्येही हीच परिस्थिती पहायला मिळाली आहे. तर बार्शीमध्ये पोलिसांनी भरचौकात पोलिसांनी संचारबंदी मोडणाऱ्यांना चोपलंय.

अतिउत्साही ठाणेकरांना पोलिसांचा प्रसाद

ठाण्याच्या  रेल्वे स्थानकात शुकशुकाट दिसून आला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा या साठी रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे शांतता पसरलीये. मात्र भाजी घेण्यासाठी ठाणेकरांनी मुख्य बाजारपेठेत सकाळीच हजेरी लावली आहे. गर्दी टाळण्यासाठी पोलीस गर्दी नं करण्याचं आवाहन करत आहेत. तरीही काही ठिकाणी लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे ठाण्यातील बाजारपेठेत मौज मजा करण्यासाठी काही तरुण फिरत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना काठीचा प्रसाद दिला. तसंच आडवून मास्क लावायला सांगितले. कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलीय, मात्र काही अतिउत्साही लोकं या आदेशाला हरताळ फासतांना पाहायला मिळतो आहे.

घरात बसा, नाही फटके बसतील!

नाशिक शहरात संचारबंदी असूनही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांना घोटी पोलिसांनी चोप दिलाय. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करूनही घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना लाठीचा प्रसाद देण्यात आलाय.

अकोल्यात नाकाबंदी

अकोल्यातील प्रत्येक चौकात पोलिसांनी नाकेबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चोप देण्यास सुरुवात केलीय. पोलिसांकडून प्रत्येक  व्यक्तीची चौकशी करण्यात येत असून विनाकारण फिरणार्याला पोलिसी खाक्या बसत आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरु नका असे आव्हाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

औरंगाबाद शहाण्याला शब्दांचा मार

औरंगाबाद शहरात सकाळी पोलिसांनी रस्त्यावर फिरत असलेल्या, काम नसतानाही फिरणाऱ्या उत्साही लोकांना समजावून सांगितले. मात्र, लोक ऐकत नसल्यानं पोलिसांनी आता फटके द्यायला सुरुवात केलीय. गरज असे तरच पडणाऱ्या आणि संचारबंदीतून ज्यांना सूट देण्यात आलीय, त्यांनाच आता रस्त्यावर येण्यास परवानगी देण्यात आलीय. दुसरे लोक बाहेर पडले तर फटके खावेच लागणार आहेत. आता औरंगाबाद शहरातील क्रांती चौक, औरंगपुरा, शहागंज, रोशन गेट, सिडको चौकात पोलिसांना चांगलाच प्रसाद दिला.

 

TWEET - 

 

 

 

TWEET -

 

 

TWEET -

 

 

 

FACEBOOK -

 

 

हेही वाचा - एssशाब्बास! कस्तुरबातील 12 जणांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश

 

lockdownindia people are still rooming outside and police beating india corona virus covid 19 india curfew

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live