माढ्यात परिवर्तन करत कमळ फुलवा - सुभाष देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 मार्च 2019

कलेढोण - ''ग्रामपंचायत निवडणुकीसारखे कार्यकर्त्यांनी माढा मतदार संघात लक्ष ठेवा. मतदाराच्या बुथ व शक्ती केंद्राकडे बारकाईने लक्ष देवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा करण्यासाठी माढ्यात परिवर्तन करून कमळ फुलवा'', असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मायणीत कार्यकर्त्यांच्या खासगी बैठकीत केले. 

त्यावेळी भाजपाचे माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर, जिल्हाउपाध्यक्ष अनिल देसाई, सदाशिव खाडे, सुरेश शिंदे, सरपंच सचिन गुदगे, खटाव तालुकाध्यक्ष विकल्प शहा, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ उपस्थित होते.

यावेळी ''खटाव-माण तालुक्यात भाजप हा विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. त्यात आता परिवर्तन आणायला हवे. त्यासाठी गावोगावचे बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, समिती प्रमुख यांना महत्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका. विरोधक हुशार आहेत. त्यांचा उमेदवार कोण हे माहीत नाही असे देशमुख म्हणाले.शरद पवार राष्ट्रवादीचे मालक आहेत. ते कधी निवडणुकीतून माघार घेतील तर कधी घरातून दहा उमेदवार देतील ? हे सांगता येत नाही असा टोलाही त्यांना यावेळी बोलताना लगावला. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपला उमेदवार कोण आहे. हे महत्वाचे नसून कमळ हेच आपला उमेदवार आहे. हे मतदाराच्या मनात बिंबवा. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी करण्यासाठी माढ्यात परिवर्तन व्हायला हवे. त्यासाठी घराघरात जावून पक्षाची ध्येय -धोरणे समजावून सांगा. गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे बाहेर किती मतदान किती आहे? याचा अभ्यास करून ते आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही देशमुखांनी केले. 

माळशिरसला बरोबर घ्यायचे ठरलंय...
गेल्यावेळी माळशिरस तालुक्यात मतदान कमी झाले. त्यामुळे आता माळशिरसला म्हणजेच मोहिते-पाटील यांना बरोबर घायच ठरले आहे. असे देशमुख यांनी बैठकीत बोलून दाखविले, त्यामुळे अप्रत्यक्ष मोहिते-पाटील घराणे भाजपाच्या वाटेवर असल्याचे अधोरेखित केले. 

Web Title: loksabha election 2019 vote for BJP to make a chage - subhash deshmukh

संबंधित बातम्या

Saam TV Live