इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नेरूळमध्ये काँग्रेसचे ‘लॉलीपॉप’ आंदोलन

विकास मिरगणे
मंगळवार, 8 जून 2021

सततचे वाढते इंधनाचे दर आणि वाढत्या महागाई विरोधात नेरुळ काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 

नवी मुंबई : सततचे वाढते इंधनाचे Fuel दर Price आणि वाढत्या महागाई Inflation विरोधात नेरुळ Nerul काँग्रेसच्या Congress वतीने आंदोलन Agitation करण्यात आले.  पेट्रोल, डिझेल व गॅस Gas दरवाढीच्या निषेधार्थ नेरूळ काँग्रेसच्या वतीने नेरूळ मधील पेट्रोलपंपावर अभिनव पध्दतीने ‘लॉलीपॉप’ आंदोलन करण्यात आले.  Lollipop Agitation By Congress In Nerul To Protest Fuel Price Hike

इलेक्ट्रिक कार खरेदी करताय? मग 'या' गाड्यांबाद्ल जाणून घ्या

पामबीच मार्गालगत असलेल्या नेरूळ सेक्टर 6 मधील पेट्रोलपंपावर काँग्रेसचे नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi व भाजप BJP सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

हे देखील पहा -

आंदोलनावेळी पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांना यावेळी काँग्रेसच्या आंदोलन कर्त्यांकडून ‘लॉलीपॉप’ चॉकलेट देण्यात आले व केंद्राने कश्याप्रकाराने सर्वसामान्य जनतेला लॉलीपॉप Lolipop देण्याचे काम केले आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारकडून सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‘अच्छे दिन’च्या घोषणाही देण्यात आल्या.

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live