आता खासगी डॉक्टरांकडून होत असलेली लूट थांबणार...उपचारांचे दर निश्चित

साम टीव्ही
सोमवार, 4 मे 2020

विविध आजार आणि व्याधींवर उपचार घेणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अनेक वैद्यकीय सेवांचे दर निश्चित करण्याचे निर्देश सरकराने दिले आहेत.

विविध आजार आणि व्याधींवर उपचार घेणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अनेक वैद्यकीय सेवांचे दर निश्चित करण्याचे निर्देश सरकराने दिले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचारानंतर, बिलाचा आकडा पाहून बसणारा धक्का, आता बसणार नाही. रुग्णालयांनी विमा कंपन्याशी असलेल्या करारानुसार सर्वांत कमी दर आकारावेत. तसेच ज्या रुग्णालयाचा विमा कंपन्याशी असा करार नाही, त्यांनीही मेंदूच्या शस्त्रक्रिया, हृदयविकार, गायनोकॉलॉजी, नेत्रविकाराशी संबधित आजारांचे दर नियंत्रणात ठेवावेत.  असे निर्देश आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिलेत.

कोणकोणते आजार आणि व्याधींवर किती दर असावेत याची काही आकडेवारी समोर आलीय त्यासाठी पाहा खालील व्हिडीओ...

दरम्यान, या निर्देशामध्ये कोव्हिडसाठी वैद्यकीय उपचार घेत असलेल्या रुग्णांनी किती बिल भरायचंय. याबाबत सुस्पष्टता नाहीये.


संबंधित बातम्या

Saam TV Live