Valentine Special | चला, प्रेमपत्रांच्या गावी जाऊन बघूया...वाचा काय आहे आगळी वेगळी संकल्पना...

Valentine Special | चला, प्रेमपत्रांच्या गावी जाऊन बघूया...वाचा काय आहे आगळी वेगळी संकल्पना...

सध्या सगळीकडे प्रेमाचा माहोल आहे, कधी चॉकलेट तर कधी वेगवेगळे गिफ्ट्स देऊन प्रेम व्यक्त केलं जातयं, पण प्रेम व्यक्त करण्याची खरी गंमत असते ती प्रेमपत्रातच. आणि पुणेमध्ये तर चक्क प्रेमपत्रच लिहून दिली जातायत.. नक्की काय आहे ही आगळी वेगळी संकल्पना.वाचा सविस्तर...

‘तुझा हात हातात दे, माझा हात हातात घे... मनाच्या रेशीमगाठी झरझरत अथांग समुद्राकडे एकच दान मागूया, जुळलेल्या रेशीमगाठींना सुटू देऊ नकोस, तुझ्याएवढं अथांग होता नाही आलं तरी चालेल, पण तुझ्याएवढा जिवंतपणा नात्यात कायम राहू दे...’ अश्शाच... अगदी अश्शाच प्रेमाच्या आणाभाका जगभरातील समुद्रकिनाऱ्यांवर घेतल्या जात असतील... प्रेमाचा अमृतानुभव साजरा करण्याचा मोसम अर्थात व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे ना हा. मग मनामनात जपलेल्या प्रेमाचा दिवा आता प्रपोजच्या किरणांनी बाहेर पडणारच ना.

पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . . तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

कोण-कुठला सातासमुद्रापार होऊन गेलेल्या संत व्हॅलेंटाईनचा बोलबाला जगभरातील कानाकोपऱ्यांत होतोय. आभाळाएवढं प्रेम एकमेकांना देण्याची वचन दिली-घेतली जातायत...

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं

इतक्या दिवस नजरेचीच लपाछपी खेळणाऱ्यांच्या नजरेत भीतीमिश्रित धीटपणा आलाय, रात्रभरच्या जागरणानं तरवटलेल्या डोळ्यांत एक अनामिक हूरहूर. आज बोलायचंच. काहीही होवो, होकार दिला तर ठीकच, पण नकार आला तर...तर किमान मनातली भावना बोलून दाखवल्याचं समाधान...’चल यार, जो होगा देखा जाएगा’  म्हणत प्रपोज करण्याचे निर्धार केले जातायत... पण मनातला प्रेमाचा समुद्र रिता कसा करायचा... डोळ्यांनी प्रेम व्यक्त होतं हे खरं असलं तरी, ते शब्द हवेतच ना सोबतीला... बस्स... प्रेमपत्र लिहायला हवं... पण ते लिहायचं कसं... असा प्रश्न ज्यांना पडलाय त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे... प्रेमाचा मनातच गोठून साचलेला समुद्र विरघळून टाकण्याची संधी दिलीय पुण्याच्या सारद मजकूरने... तुम्ही फक्त इतकंच करायचं... मनातली भावना बोलून दाखवायची... ती भावना तंतोतंत शब्दांत मांडणार आहे सारद मजकूर... अट फक्त एकच, तुम्ही तुमची भावना सारद मजकूरसमोर निखळपणे व्यक्त करायची.

इतकंच नाही, तर प्रेमपत्र लिहणाऱ्याचं नाव गोडगुपित ठेवलं जाणारेय आणि हे प्रेमपत्र तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीपर्यंत अलगद पोहोचवण्याचं कामही सारद मजकूरच करणारेय.

त्यामुळे, वाट कसली बघताय, उठा आणि सारद मजकूरला साद घाला. एकमेकांच्या जगात पुन्हा एकदा शिरा. मनाचं आभाळ मोकळं करा. आयुष्यभराचं संचित साठवण्यासाठी रितं करा. आपण प्रेम करत असलेल्या अन् आपल्यावर प्रेम करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज आठवूया, ओसंडून सांडेपर्यंत साठवूया

शब्दांच्या या धुक्यामधे अडकू नकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com