रुग्णांना निकृष्ठ दर्जाचे जेवण; बुलडाण्यातील चिखलीच्या कोविड सेंटर मधील प्रकार.. 

संजय जाधव
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांना कोविड सेंटर मध्ये दुपारचे पाऊणे एक वाजले तरीही कोरोना रुग्णांना जेवण न मिळाल्याने, कोरोना ग्रस्थ रुग्ण हे भुकेने व्याकुळ झाल्याने, अखेर कोव्हिडं सेंटरच्या बाहेर येऊन बसले आहेत

बुलढाणा : कोरोना Corona पॉजिटीव्ह रुग्णांना कोविड सेंटर मध्ये आज दुपारचे पाऊणे एक वाजले तरीही कोरोना रुग्णांना जेवण न मिळाल्याने, कोरोना ग्रस्थ रुग्ण हे भुकेने व्याकुळ झाले होते. अखेर कोव्हिडं Covid सेंटरच्या बाहेर येऊन बसले आहेत. हा संपूर्ण प्रकार चिखली Buldana Chikhali येथील कोव्हिडं सेंटरवर घडला आहे. याठिकाणी रुग्णांना पिण्यास पाणीही उपलब्ध नसल्याने आणि जेवण निकृष्ठ दर्जाचे असल्याने रुग्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.Low Quality food provided to Corona Patients in Buldana

या कोविड सेंटरला १५० च्या जवळपास कोरोना पॉजिटीव्ह Positive रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना दररोज सकस आहार देणे आणि वेळेवर देणे आवश्यक असताना ही मात्र, निकृष्ट जेवण तेही उशिरा देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांनी प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. 

चिखलीच्या या कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांनी स्वाभिमानी संघटनेकडे अनेकवेळा जेवणाबाबत तक्रारी केल्या होत्या. यासंदर्भात चिखलीचे तहसीलदार यांना ही बाब स्वाभिमानीच्या स्थानिक नेत्यांनी सांगितली होती. मात्र जेवण उत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले. Low Quality food provided to Corona Patients in Buldana

मात्र, आज प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच पाहायला मिळाली आहे. त्यामुळे जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराला तहसीलदार पाठीशी घालत आहे का ? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. या दोघांवरही कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live