नोकरी देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश... 

अश्विनी जाधव-केदारी
शुक्रवार, 4 जून 2021

भारतीय सैन्यदलाची बनावट वेबसाईट तयार करून त्याआधारे सैन्यदलातील नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्र देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे

पुणे : भारतीय सैन्यदलाची Indian Army बनावट वेबसाईट Website तयार करून त्याआधारे सैन्यदलातील नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्र Certificate देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. The lure of getting a job by creating a fake military website 

या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक Arrested करण्यात आली. भारत कृष्णा काटे (वय 41) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या आणखी काही साथीदारांच्या शोध सुरू आहे.

सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घट   

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी Police विशेष पथकाची स्थापना केली आहे. याप्रकरणी सलमान गौसउद्दीन शेख (वय 21, करडखेर गाव, लव्हारा, उदगीर, लातूर) या तरुणाने तक्रार दिली आहे. The lure of getting a job by creating a fake military website 

हे देखील पहा 

आरोपी Accused भारत काटे याने आतापर्यंत फिर्यादी आणि त्याच्या काही साथीदारांनकडून आतापर्यंत 13 लाख 50 हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये 9 तरुणांनी अशा प्रकारे आपली फसवणूक झाल्याचे सांगत तक्रार दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live