VIDEO | तुमच्या हातात कोरोना! मोबाईलवर कोरोनाचा विषाणू 48 तास जिवंत राहू शकतो...

अश्विनी जाधव-केदारी
मंगळवार, 17 मार्च 2020

तुमच्या हातात आणि तुमच्या खिशात कोरोना असण्याची शक्यता नाकारता येत नाहीए. कारण जी माहिती समोर आलीय. त्यानुसार मोबाईलवर कोरोना तब्बल 2 दिवस जिवंत राहतो. तुम्हाला सतर्क करणारी, साम टीव्हीची ही बातमी पाहा...

 

लगेच घाबरून जाऊ नका. पण वेळीच सतर्क व्हा. कारण तुमचा स्मार्टफोन कोरोनाचा स्मार्ट वाहक होऊ शकतोय. तुम्ही ज्या फोनला हातातून सोडत नाही. तो फोनसुद्धा कोरोनाला सहजासहजी सोडत नाहीए. मोबाईलवर कोरोना व्हायरस तब्बल 48 तास जिवंत राहतो. 

जी माहिती समोर येतेय. ती सगळ्यांचीच झोप उडवणारी आहे. आजच्या काळात मोबाईलला टाळणं कठीण आहे, आणि कोरोनाला टाळणं तितकंच महत्त्वाचं आहे.  म्हणून आम्ही तुम्हाला काही सूचना करतोय. त्या काटेकोरपणे पाळा.. 

कोरोनाशी लढायचंय. त्याला दूर पळवायचंय.. तेव्हा इतकी खबरदारी घ्यावीच लागेल. तुमचा मोबाईल तुम्हालाच कोरोनापासून दूर ठेवावा लागणार आहे. आणि तुम्हालाच त्याची स्वच्छताही करावी लागणार आहे. प्रशासन तुमची-आमची काळजी घेण्यासाठी सज्ज आहेच. मात्र आपणही आपआपल्या परीने दक्ष राहायला हवंय. कारण फक्त कोरोनाच नाही, तर कुठलाही आजार पसरु नये म्हणून या सवयी यापुढेही कामी येतील. काळजी घ्या.. काळजी करु नका. 


संबंधित बातम्या

Saam TV Live