#Viralsatya | सॅनिटायझरचा अतिवापर घातक? त्वचेला नुकसान होण्याची शक्यता

माधव सावरगावे
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोना व्हायरसच्या धास्तीने स्वच्छतेसाठी अनेकजण सॅनिटायझरचा वापर करतायत. पण, सॅनिटायझरचा अतिवापरही केला जातोय. त्यामुळं अतिवापर घातक ठरू शकतो असा दावा करण्यात आलाय. त्यामुळं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा. पण हे खरं आहे का पाहुयात.

कोरोना व्हायरसच्या भीतीने स्वच्छतेचा अतिरेक सुरु झालाय. सॅनिटायझरच्या वापरात प्रचंड वाढ झालीय. मात्र, हा अतिरेकी वापरही हातांसाठी घातक ठरू शकतो. वारंवार सॅनिटायझर वापरल्याने हातावरील त्वचेला हानी पोहोचते. इतकंच नव्हे तर बाहेरील विषाणू, जिवाणू रोखून धरण्याची क्षमता कमी होऊ शकते. हाताची आणि शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमताही कमी होऊ शकते असा दावा करण्यात आलाय.

महापालिके मार्फत साबणाने हात धुण्याचा सल्ला दिला जातोय. मात्र, मुंबईसारख्या शहरात सॅनिटायझरचा वापर वाढू लागलाय. खासकरुन लहान मुलांना सॅनिटायझर वापरायला देण्याचे प्रकार वाढलेयत. पण, 60 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कहोलचे प्रमाण असलेले सॅनिटायझर हातासाठी घातक ठरू शकतात असाही दावा केला जातोय. त्यामुळं खरंच सॅनिटायझरचा अतिवापर घातक ठरू शकतो का याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.

सॅनिटायझरचा वापरामुळे हातांची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे सॅनिटायझरचा अतिवापर घातक ठरू शकतो. म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी तेदेखील जाणून घेतलं. त्यामुळं आमच्या पडताळणीत सॅनिटायझरच्या अतिवापराचा काय परीणाम होऊ शकतो पाहुयात.

गरजेपुरताच सॅनिटायझर वापर करा. अतिवापर करणं योग्य नाही. त्यामुळं सॅनिटायझरचा अतिवापर घातक ठरू शकतो हे आमच्या पडताळणीत सत्य ठरलं.


संबंधित बातम्या

Saam TV Live