मध्य प्रदेशात पुन्हा राजकीय भूकंप; काँग्रेसचे 17 आमदार पळाले?

मध्य प्रदेशात पुन्हा राजकीय भूकंप; काँग्रेसचे 17 आमदार पळाले?


भोपाळ  : मध्य प्रदेशात सत्तेत असलेल्या काँग्रेसची Congress डोकेदुखी थांबण्याची काही चिन्हे नाहीत. काठावरचं बहुमत असलेल्या काँग्रेसचे आणखी काही आमदार बेंगळुरूला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळं कमलनाथ Kamalnath सरकार पुन्हा अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज, सकाळीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिल्लीला भेट देऊन पक्ष श्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेपासूनच अस्वस्थता आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस वाढली आहे. काँग्रेसमध्ये कमलनाथ यांचा एक गट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक गट असा सामना आहे. दुसरीकडे राज्यात दिग्विजय सिंह यांचाही एक गट सक्रीय आहे. या सगळ्यांत सत्ताधारी पक्षा अडचणीत आला आहे. कमलनाथ यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी सगळं काही ठीक असल्याचं सांगितलं. पण, सध्याच्या स्थितीत काँग्रेसमध्ये ऑल इज वेल आहे, असं वाटत नसल्याचं बोललं जातंय. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे 11 आमदार बेपत्ता असल्याची चर्चा होती. पण, त्यातील सात परतले आणि चार बेंगळुरूला गेल्याचे सांगितले जात होते. त्या चार पैकी दोन भोपाळला आले. पण, दोघांशी पक्षातील नेत्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्या दौघांना आता आणखी 15 ते 17 आमदार मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे गटाचं बंड?
मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यापैकी 114 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. तर भाजपच्या 107 जागा आहेत. बसपच्या दोन, समाजवादी पक्षाची एक आणि चार अपक्ष आमदार आहेत. या सभागृहात 34 मंत्र्यांची नियुक्ती होऊ शकते. सध्या मुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री मंत्रिमंडळात कार्यरत आहेत. त्यामुळं आणखी पाच मंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे यांना मानणारा गट मुख्यमंत्री कमलनाथ आणि पक्ष श्रेष्ठींवर दबाव टाकत असल्याचं बोललं जात आहे. बेंगळुरूला गेलेल्या 15 ते 17 आमदारांपैकी सर्वाधिक आमदार हे ज्योतिरादित्य शिंदे गटाचे आहेत. 

राज्यसभेसाठी धडपड
येत्या 26 मार्च रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी, 13 मार्चपर्यंत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या तीन जागांवर निवडणूक होत आहे. सभागृहातील काँग्रेसचे संख्याबळ पाहता. तीन पैकी दोन जागा काँग्रेसला मिळतील, अशी शक्यता आहे. पण, त्यासाठी बेंगळुरूला गेलेले आमदार पुन्हा काँग्रेसच्या शामीयान्यात परतावे लागणार आहेत.

दिल्लीत पक्ष श्रेष्टींशी राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारी संदर्भात चर्चा झाली. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरही पक्ष नेतृत्वाशी बोलणं झालेलं आहे. 
- कमलनाथ, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश 


Web Title: madhya pradesh congress crisis around 17 mlas are not reachable kamal nath jyotiraditya shinde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com