15 महिन्यांत कमलनाथ सरकार कोसळलं! कमलनाथ यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

ब्युरो रिपोर्ट
शुक्रवार, 20 मार्च 2020

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम करताच, बावीस आमदारांनी राजीनामा दिला. होती. त्यानंतर कमलनाथ सरकार अल्पमतात आलं होतं.

मध्य प्रदेश - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा दिला आहे. 15 महिन्यात कमलनाथ सरकार कोसळलंय. राज्यपालांना भेटून औपचारिकता पूर्ण करणार आहेत. मध्य प्रदेश विधानसभेत आज बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम करताच, बावीस आमदारांनी राजीनामा दिला. होती. त्यानंतर कमलनाथ सरकार अल्पमतात आलं होतं. मध्य प्रदेश विधानसभेत आजच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले होते. आज संध्याकाळी पाच वाजता विधानसभेत बहुमत चाचणी आधीच कमलनाथ यांचं सरकार कोसळलं. निव्वळ 15 महिन्यात काँग्रेसचं मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पडलं आहे. 

 

काँग्रेसमध्ये 18 वर्ष काम केलेल्या ज्योतिरादित्य सिंधियांच्या राजीनाम्याने काँग्रेसला जबर धक्का बसला होता. ज्योतिरादित्य सिंधियांनी काँग्रेसच्या अनेक आमदारांनाही सोबत घेतल्यानं काँग्रेसला अक्षरश: भगदाड पडलं. त्यामुळे कमलनाथ सरकार अवघ्या 15 महिन्यांतच डळमळीत झालं.

 

TWEET - 

 

कोण आहेत ज्योतिरादित्य सिंधिया?

- ज्योतिरादित्य 2001  ते 2019 सालापर्यंत तब्बल 17 वर्ष गुणा मतदारसंघाचे खासदार होते

- काँग्रेसनं त्यांना 2007 साली माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री, 2009 साली उद्योग राज्यमंत्री केलं.

- तर 2012 साली ऊर्जा राज्यमंत्रिपदी निवड करण्यात आली.

- गेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र बालेकिल्ला असलेल्या गुणा मतदारसंघात पराभव झाला.

- भाजपचा उधळलेला वारू ज्योतिरादित्य सिंधियांनी मध्य प्रदेशात मात्र रोखला.

- मात्र काँग्रेसने ज्योतिरादित्य सिंधियांऐवजी कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची माळ घातली.

- तेव्हापासूनच ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा होती.

- मध्य प्रदेश सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याची त्यांची भावना होती.

- गेल्या काही वर्षांत भाजपसोबत त्यांचं गुप्तगू चालल्याचीही चर्चा होती.

 

TWEET - 

 

 

मुख्यमंत्रिपद नाकारल्यावर ज्योतिरादित्य यांच्या मनात धुमसणाऱ्या नाराजीला आता भाजपने ठिणगी दिल्याची चर्चा होती. त्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय आगडोंब उसळला होता.

 

 

madhya pradesh kamalnath resign from cm cong govt collaps marathi


संबंधित बातम्या

Saam TV Live