मुंबईच्या पर्यटकांना महाबळेश्वरचा सोस नडला; भरावा लागला भरभक्कम दंड

ओंकार कदम
रविवार, 25 एप्रिल 2021

पर्यटकांना नेहमीच आकर्षण असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये सुद्धा पर्यटकांना मज्जाव करण्यात आलेले असताना सुद्धा मुंबई येथील काही पर्यटकांनी महाबळेश्वर येथे सुट्ट्या घालवायचा बेत आखला आणि मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास सर्वांच्या नजरा चुकवत केला सुद्धा.

सातारा : कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या सरकार ने कडक लॉकडाउन Lock Down घोषित केला आहे त्यामुळे सर्व पर्यटन स्थळे सुद्धा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. सातारा Satara जिल्ह्यात सुद्धा कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्ये मुळे प्रशासन अॅलर्ट आहे. Mahabaleshwar Administration fined Tourist flouted Corona Rules

पर्यटकांना नेहमीच आकर्षण असणाऱ्या महाबळेश्वर Mahabaleshwar मध्ये सुद्धा पर्यटकांना Touristsमज्जाव करण्यात आलेले असताना सुद्धा मुंबई Mumbai येथील काही पर्यटकांनी महाबळेश्वर येथे सुट्ट्या घालवायचा बेत आखला आणि मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास सर्वांच्या नजरा चुकवत केला सुद्धा.

परंतु महाबळेश्वर नगरपालिका आणि सध्या २४ तास ऑन ड्युटीवर असणाऱ्या महाबळेश्वर येथील प्रशासनाने या पर्यटकांना गाठलंच आणि ज्या हॉटेल ला हे पर्यटक राहायला आले होते त्या हॉटेलच्या Hotel दारातच या पर्यटकांना गाठून त्या पर्यटकांच्या कडून ३० हजार आणि हॉटेल वर कारवाई करून २५ असा ५५ हजाराचा दंड वसूल केला. Mahabaleshwar Administration fined Tourist flouted Corona Rules

त्याच प्रमाणे हॉटेल च्या व्यवस्थापनाला परत असा गुन्हा घडला तर कायम स्वरूपी हॉटेल बंद करण्याची कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला महाबळेश्वर च्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केलेल्या या धडक कारवाई मुळे आता पोलिसांची नजर चुकवून महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांवर चांगलीच जरब बसणार आहे.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live