महाबळेश्वर नगरपालिकेने अंबानींचे ईव्हीनिंग वॉक केले बंद

ओंकार कदम 
सोमवार, 3 मे 2021

अंबानींचे ईव्हीनिंग वॉक महाबळेश्वर नगरपालिकेने केले बंद आहे अअनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी ईव्हीनिंग वॉकला येत असणाऱ्या 'द क्लबला' पालिकेची नोटीस बजावली आहे. महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकारवाईची सध्या  जोरदार  चर्चा  सर्वत्र सुरु आहे.

सातारा - अंबानींचे ईव्हीनिंग वॉक evening walk महाबळेश्वर Mahabaleshwar नगरपालिकेने केले बंद आहे अनिल अंबानी Anil Ambani आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी Tina Ambani ईव्हीनिंग वॉकला येत असणाऱ्या 'द क्लबला' पालिकेची नोटीस बजावली आहे. महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील Pallavi Patil यांच्याकारवाईची सध्या जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे.  Mahabaleshwar Municipality closed Ambani's evening walk

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये प्रसिध्द उद्योगपती अनिल अंबानी हे आपली पत्नी टिना अंबानीसह राज्यात लाॅकडाउन काळात बऱ्याच दिवसांपासून वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते इव्हनिंग वाॅक करण्यासाठी गोल्फ मैदानावर येत होते.

कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. संचार बंदीच्या काळात त्यांच्या या वॉक ची चर्चा सर्वत्र होऊ लागली. 

त्यामुळे इव्हिनिंग वाॅकसाठी या मैदानावर इतर नागरिकांची गर्दी देखील वाढली होती याची माहिती महाबळेश्वर नगरपालिकेला मिळताच महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी तडका फडकी कारवाई करत गोल्फ मैदानाच्या द क्लबला नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. पालिकेने नोटीस बजावल्या मुळे द क्लब ने गोल्फ मैदान फिरण्यासाठी बंद केले असुन आता या मैदानावर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकारवाईची सध्या जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे.  

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live