VIDEO | राज्यव्यापी बंदचे मुंबईत पडसाद

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात ही महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये तब्बल 25 ते 30 संघटना सहभागी होतील असे आंबेडकर यांनी सांगितले. ​

 

मुंबई : नागरिकत्त्व सुधारणा कायदा, एनआरसी व खासगीकरणाचा विरोध म्हणून वंचित बहुजन आघाडीचा आज महाराष्ट्र बंद आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात ही महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये तब्बल 25 ते 30 संघटना सहभागी होतील असे आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे राज्यभारात ठिकठिकाणी पोलिस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

देशभरात सीएए व एनआरसी विरोधात भडका उडालेला असताना आता वंचित आघाडीही याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. हे असे कायदे लागू करण्यामागे सरकारची दडपशाही आहे. देशभरात इतकी जाळपोळ आणि दंगे होत असताना दुसरीकडे अस्थिर झालेल्या अर्थव्यवस्थेकडे मात्र सरकारचे लक्ष नाही असे, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. या सगळ्याला विरोध म्हणून वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्र बंद ठेवेल. पण हा बंद शांततापूर्ण वातावरणात व्हावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

सरकारने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयाचा फटका नागरिकांना बसतो, त्यामुळे देशभरात निषेधाचे वातावरण तयार झाले आहे. या बंदमध्ये साधारण समविचारांच्या 25 ते 30 संघटना सहभागी होतील, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. या बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.   

Web Title: Maharashtra Bandh strike by Vanchit Bahujan Aghadi
 


संबंधित बातम्या

Saam TV Live