धक्कादायक... महाराष्ट्र बेरोजगार होतोय, महाराष्ट्राची अवस्था बिकट! वाचा ही सविस्तर माहिती

साम टीव्ही
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020
  • धक्कादायक... महाराष्ट्र बेरोजगार होतोय
  • आर्थिक गाडा कोरोनाच्या चिखलात रुतलेलाच
  • 'पुनःश्च हरिओम'नंतरही महाराष्ट्राची अवस्था बिकट

अनलॉक करूनही महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीत म्हणावी तशी सुधारणा झालेली नाहीय... महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रासमोर बेरोजगारीची मोठी समस्या उभी राहिलीय. राज्याच्या अर्थ खात्याने सादर केलेल्या अहवालातून ही चितांजनक गोष्ट समोर आलीय.

कोरोनाच्या संकटामुळे केलेल्या लॉकडाऊनच्या काळात सगळेच उद्योग-व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे, महाराष्ट्राची आर्थिक अवस्था संपूर्णपणे कोलमडून गेली. अर्थचक्राला गती देण्यासाठी पुनःश्च हरिओम अंतर्गत अनलॉक सुरू केलं. त्यानंतर काही प्रमाणात उद्योग सुरू झाले, मात्र तरीही महाराष्ट्राची आर्थिक घडी बसलेली नाही. महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबाबत अर्थखात्याने नुकताच मुख्यमंत्री, आणि राज्यातील महत्वाच्या मंत्र्यासमोर प्रेझेंटेशन केले. त्यात या गोष्टी समोर आल्यायत.

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्राचा बेरोजगारी दर 20.9 टक्क्यांपर्यंत वाढला होता. अनलॉकमुळे जुलै महिन्यात बेरोजगारीचा दर 3.9 टक्क्यांनी घसरला असला तरी ऑगस्टच्या अखेरीस बेरोजगारीचा दर पुन्हा 6.9 टक्क्यांनी वाढला. त्याचसोबत महाराष्ट्राच्या आर्थिक अवस्थेतही मोठा खड्डा पडलेला आहे. उद्योग आणि सेवाक्षेत्र अजूनही मोठ्या अडचणीत आहे. महत्त्वाचं म्हणजे जीएसटी परतावा कमी आल्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक संकटात आणखी भर पडलीय.

याचाच अर्थ असा होतो की, कृषी क्षेत्र वगळता इतर सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राची अभूतपूर्व वाताहत झालीय. उद्योग बंद पडत आहे, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी कोरोनाबाबत काळजी घेत सक्षम अशा उपाययोजना राबवायला हव्यात. तरच अनलॉकच्या 'पुनःश्च हरिओम' या उक्तीचा महाराष्ट्राला खरा फायदा होईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live