माजी मंत्री संजय देवतळे यांचे निधन

संजय तुमराम
रविवार, 25 एप्रिल 2021


चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री भाजप नेते संजय देवतळे यांचे निधन झाले. देवतळे हे चार वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. आमदार, जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रीपदाचा कार्यभार देवतळे यांनी सांभाळला होता.

चंद्रपूर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री भाजप नेते संजय देवतळे यांचे निधन झाले. देवतळे हे चार वेळा काँग्रेसच्या Congress तिकिटावर वरोरा Varora विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. आमदार, जिल्ह्याच्या Chandrapur पालकमंत्रीपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रीपदाचा कार्यभार देवतळे यांनी सांभाळला होता. Maharashtra Ex Minister Sanjay Teotale Passed Away

२०१४ च्या निवडणुकीत देवतळे यांनी भाजपात BJP प्रवेश करुन निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुक त्यांनी शिवसेनेच्या Shivsena तिकिटावर लढवली होती.  मात्र त्यात ते पुन्हा पराभूत झाले. नुकतेच केंद्रीय मंत्री गडकरी Nitin Gadkary यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला होता.

देवतळे यांचे कौटुंबिक सदस्य कोरोनाने बाधीत निघाल्यावर देवतळे यांनी स्वतः कोरोना Corona चाचणी करुन घेतली. त्यात त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर गेले सहा दिवस नागपुरात त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात सुरू उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live