राज्याला अतिरिक्त रेमडिसिवीर मिळणार; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

साम टिव्ही ब्युरो
रविवार, 25 एप्रिल 2021

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्राला ३० एप्रीलपर्यंत ४ लाख ३५ हजार रेमडिसिवीरचा पुरवठा होईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. त्यावरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  आभार मानले आहेत

मुंबई : कोरोनाचा Corona सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्राला ३० एप्रीलपर्यंत ४ लाख ३५ हजार रेमडिसिवीरचा पुरवठा होईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. त्यावरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी केंद्र सरकारचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांचे आभार मानले आहेत. Maharashtra To Get Additional quota of Remdisivir Injections

राज्यात रेमडिसिवीरच्या Remdisivir इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे गंभीर कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूदरात वाढ होते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला रेमडिसिवीरच्या अतिरिक्त पुरवठ्याची मागणी केली होती. ती मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी सुमारे अडीच लाख इंजेक्शने राज्याला दिली जात होती. त्यात वाढ करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. 

दिलासादायक - मुंबईत रुग्णवाढ स्थिरावली

राज्यात Maharashtra काल ६७ हजार १६० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासात ६७६ मृत्यू झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ४२ लाख २८ हजार ८३६ रुग्ण सापडले आहेत. तर ३४ लाख ६८ हजार ६१० रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live