विरार आग प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

विरारमधील Virar विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता ICU विभागास आग लागून १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thacekray  यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत

मुंबई : विरारमधील Virar विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता ICU विभागास आग लागून १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thacekray  यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil यांनी ट्वीट करुन सांगितले आहे. Maharashtra Government orders inquiry in Virar Fire incident

आज दिनांक २३/०४/२०२१ रोजी रात्रौ ०३:१३ वाजताच्या सुमारास तिरुपती नगर, बंजारा हॉटेलच्या मागे, विरार(प.) येथे विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये(तळ+४) दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात आग लागली होती सदर घटनास्थळी विरार अग्निशमन दलाचे ०३-फायर वाहन उपस्थित होते. सदरची आग अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे ०५:२० वा. सुमारास विझवली आहे.  सदर घटनेत १३ रुग्णांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला असून ५ ते ६ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे 

उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश  दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. Maharashtra Government orders inquiry in Virar Fire incident

ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने चौकशी करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 

विरार वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीतील मृतांची नावे

उमा सूरेश कनगुटकर ६५
निलेश भोईर ३५
पुरवराज वैष्णव ६८
रजनी आर कडू ६०
नरेंद्र शंकर शिंदे ५८
कुमार किशोर दोशी ४५
जनार्दन मोरेश्वर म्हाञे ६३
रमेश टी उपायानी ५८
प्रवीण शिवलाल गौडा ५३
अमेय राजेश राऊत २८
शमा अरुण म्हाञे ४८
सुवर्णा एस पितळे ६४
सुप्रिया देशमुख  ४३


संबंधित बातम्या

Saam TV Live