लाॅकडाऊन वाढविण्याबाबत राजेश टोपेंनी दिले 'हे' संकेत

Rajesh Tope
Rajesh Tope

मुंबई : पुढील काही दिवसांत राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेणार असून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत राहिली तर १ जून पासून टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊन उठविण्याचा विचार होऊ शकतो, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. Maharashtra Health Minister Rajesh Tope Hints at lifting curbs in June

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज घट होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत याचा आढावा घेऊन लाॅकडाऊन टप्प्याटप्प्याने उठविण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे टोपे म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मात्र, नियंत्रण उठवणे म्हणजे लोकांना कसेही वागण्याचे स्वातंत्र्य देणे नव्हे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. रुग्णसंख्या आणखी कमी करण्यासाठी कोरोना विषयक नियमांचे कडक पालन करावेच लागेल, असेही टोपे म्हणाले. 

हे देखिल पहा

राज्यात शनिवारी २६ हजार १३३ नवे कोरोनो रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ लाख ५३ हजार झाली आहे. शनिवारी राज्यात ६८२ मृत्यू झाले. कोरोनाने राज्यात आतापर्यंत ८७ हजार ३०० मृत्यू झाले आहेत. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जूनमध्ये निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. मात्र, कोरोना विषयक नियमांचे पालन लोकांनी करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 

दरम्यान "कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश आलेले नाही. पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत व कुशल आहे,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. Maharashtra Health Minister Rajesh Tope Hints at lifting curbs in June

मुख्यमंत्र्यांनी आज कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्ससह राज्यातील बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "कोरोन विषाणूची जशी संसर्गाची साखळी असते तशी आपण आपली देखील एक घट्ट साखळी तयार करून, एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करू. घाबरू नका, चिंता करू नका, आपल्या फॅमिली डॉक्टर , ज्याला मी “माझा डॉक्टर” असे म्हणतो त्याला वेळीच मुलाला दाखवा, म्हणजे उपचार लगेच सुरु करता येतील,''
Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com