बाहेर पडाल तर असच होणार! सांगलीत दुपटीनं रुग्ण वाढले, संख्या 116वर

ब्युरो रिपोर्ट
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनाचा संसर्ग किती वेगानं पसरतो, हे दाखवणारी आकडेवारी महाराष्ट्रातूनच समोर येते आहे. सांगलीत एका दिवस रुग्णांचा आकडा डबल झाला आहे. ही बाब चिंताजनक आहे.

सांगली - महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 112वर पोहोचली आहे. सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या नव्या आकडेवारीनुसार सांगलीत आता कोरोनाबाधितांचा आकडा 9 वर गेला आहे. महाराष्ट्राला हादरून सोडणा-या या बातमीने प्रत्येकजण धास्तावलाय. आता सांगलीतील प्रशासनासमोरचीही आव्हानं वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाला अधिक सतर्क आणि सजग राहायला लागणारे. 

 

नवी मुंबईतही नवा रुग्ण

तर इकडे नवी मुंबईत पाचवा कोरोना रूग्ण आढळला आहे. वाशीतल्या एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालंय.  फिलीपीन्स नागरिकाच्या संपर्कात आल्याने कोरोना पॉझीटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण गेली आठवडाभर होम क्वारन्टाईन झाले होता. सध्या त्याच्या मुलाला आणि पत्नीला कस्तूरबामध्ये तपासणीसाठी मनपा प्रशासन घेवून गेले आहेत. यांनी लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. 

 

मुंबईत 4 नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाचे आणखी 4 नवे रुग्ण आढळलेत. त्यामुळं आता मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 45वर गेलीय. तर राज्यात  कोरोनाग्रस्तांची संख्या 116 झालीय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय.

 

दहावीच्या मुलाला कोरोना

दक्षिण मुंबईतील 10वीत शिकत असलेला 15 वर्षीय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याच्या परीक्षेदरम्यान संपर्कात आलेल्या 36 विद्यार्थी आणि शिक्षकांची तपासणी केली जाणार आहे. काल कस्तुरबा रुग्णलयात पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळल्यानंतर हा विद्यार्थी 10 वी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान  36 विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कात आल्याच समोर आलं आहे. याची माहिती शिक्षण विभागाने आरोग्य विभागाला दिली असून यांची घरी जाऊन कोरोना टेस्ट केली जातेय.

तसेच या विद्यार्थ्यांचे वडील 13 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईत आले होते. त्यानंतर कस्तुतबाला ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या घरातील हा 15 वर्षाचा मुलगा आणि त्यांची मुलगी हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून कस्तुरबा रुग्णलायत उपचार घेत आहेत.

 

कोरोनाचा संसर्ग किती वेगानं पसरतो, हे दाखवणारी आकडेवारी महाराष्ट्रातूनच समोर येते आहे. सांगलीत एका दिवस रुग्णांचा आकडा डबल झाला आहे. ही बाब चिंताजनक आहे.

 

राज्यात कुठे किती रुग्ण आहेत? (सकाळी 11 पर्यंतची आकडेवारी)

मुंबई 45 
पुणे 19 
पिंपरी चिंचवड 12
नागपूर 4 
यवतमाळ 4 
अहमदनगर 3 
ठाणे 3 
सातारा 2 
पनवेल 1
उल्‍हासनगर 1
सांगली 9 
औरंगाबाद 1
रत्‍नागिरी 1
वसई-विरार 1
नवी मुंबई 5 
कल्‍याण 5

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुढीपाडव्यानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं बोललेत. पाहा व्हिडीओ - 

 

 

 

 

 

 

 

 

maharashtra increing covid 19 patient double in sangali marathi

 

 

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live