कोरोना रूग्णसंख्येत महाराष्ट्रानं 198 देशांना टाकलं मागे

साम टीव्ही
रविवार, 14 जून 2020

 

  • महाराष्ट्र देशा नव्हे कोरोनाच्या देशा...
  • कोरोना रूग्णसंख्येत महाराष्ट्रानं 198 देशांना टाकलं मागे
  • कोरोनाला आवर घालण्याचं मोठं आव्हान

कोरोनासंकट सुरू झाल्यापासून आजतागायत राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. आता तर महाराष्ट्रानं रूग्णसंख्येत 1 लाखांचा टप्पा ओलांडलाय. विशेष म्हणजे ज्या चीनमधून कोरोनाची सुरुवात झाली, त्या चीनला चार दिवसांआधीच महाराष्ट्रानं मागे सोडलंय. चीनमध्ये संक्रमितांचा आकडा 83 हजारांच्या जवळपास आहे. महाराष्ट्र जर देश असता तर कोरोना रुग्णसंख्येत तो जगात 17 व्या क्रमांकावर आला असता. चीन, जपान, कॅनडा,  बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया अशा अनेक प्रमुख देशांना महाराष्ट्रानं मागे टाकलंय. हे झालं रूग्णसंख्येच्या बाबतीत. राज्यातील मृतांची संख्या ही जगातील 196 देशांतील मृतांच्या संख्येहूनही अधिक आहे. 

 

  • जूनच्या 12 दिवसात महाराष्ट्रात 30 हजार नव्या रूग्णांची भर पडलीय. 
  • राज्यातील बळींची संख्या 3 हजार 717 इतकी आहे. 
  • यातील 55 टक्के मृत्यू एकट्या मुंबईतील आहेत. 
  • 23 मार्चला महाराष्ट्रात पहिला लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा अवघे 97 रूग्ण होते. 
  • 20 हजार रूग्णसंख्या होण्यासाठी महाराष्ट्रानं 62 दिवस घेतले 
  • त्याच महाराष्ट्रात नंतर अवघ्या 34 दिवसात 80 हजार रूग्णांची भर पडली
  •  

मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, सोलापूर, जळगाव, अकोला, अमरावती हे महाराष्ट्रातील कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. 

देशातील कोरोना रूग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेलीय. यात महाराष्ट्राचा वेग सर्वाधिक आहे. हीच परिस्थिती राहिली तर जूनअखेरीस देशातील रूग्णांचा आकडा 10 लाखांपर्यंत पोहचण्यास फारसा वेळ लागणार नाही. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live